करमाळा प्रतिनिधी:- करमाळा शहरातील युवक आकाश सिंधी याने दररोज न चुकता सलग 390 दिवस यु टयुब ब्लॉग बनवून सोलापूर जिल्हयातीलब्लॉगर किंग म्हणून नावारूपाला आला आहे. करमाळा शहरासह इतर विविध जिल्हयातून आकाश सिंधीवर अभिनंदनाचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे.
याबाबत आकाश सिंधी याच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितले की, मी सहज एक ब्लॉग बनविण्याचा विचार केला होता परंतु युटयुब प्रेमींच्या सहकार्याने तो माझा छंद व जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. दररोज मी सकाळी करमाळयाची कुलस्वामिनी आई कमला भवानीचे दर्शन यु टयुबच्या माध्यमातून सर्वांना देत असतो व त्यानंतर शहरातील विविध ठिकाणे हॉटेल्स, महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी, विविध उत्सव, सामाजीक कार्ये यावर आधारीत ब्लॉग तयार करून लोकांपर्यंत पोहविण्याचे विनामुल्य काम केले आहे. तसेच करमाळा शहरातील विविध ठिकाणी जावून फूड ब्लॉगिंग चे सुद्धा व्हिडीओ करून खादय प्रेमींना कोणत्या पदार्थाची कशी चव आहे हे सांगून त्या हॉटेल्सची विनामुल्य जाहिरात केली आहे तसेच चव चाखलेल्या पदार्थाचेही मी प्रत्येक ठिकाणी बील अदा केले असल्याचेही सिंधी याने सांगितले.
तसेच सिंधी हे ब्लॉग बनवताना स्वत: जीम ला जावून शरीराचीही काळजी घेतात. तसेच ब्लॉग बनविताना आजतागायत कोणीही कसल्याही प्रकारचा अडथळा आणला नाही. त्याच प्रमाणे विविध जिल्हयातून येणारे प्रवासी सुद्धा सिंधी यांना संपर्क साधून उत्तम प्रतीचे जेवण कोठे मिळेल याची चौकशी करतात. त्यामुळे सिंधी हे करमाळया बरोबरच इतर जिल्ह्यातही चांगल्या परिचयाचे झाले आहेत. ब्लॉग करताना त्यांनी त्यांची दैनदिन जीवन पध्दतीसुध्दा यावर दाखवीत असल्याने त्याचे अनुकरण करत त्याची मुलगी समायरा वय 6 वर्षे ती सुध्दा ब्लॉग बनविण्यास सुरुवात केली आहे
हे सर्व ब्लॉग बविण्यासाठी सिंधी यांना लखन कोठावळे यांची बहुमोल साथ मिळाली असल्याचेही सिंधी यांनी शेवटी सांगितले.