June 28, 2025 10:00 pm

वीज मीटर बदलाच्या नावाखाली लाच मागणाऱ्यांपासून सावध राहा – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा इशारा

अपनी भाषा में पढ़े! Translate

वीज मीटर बदलाच्या नावाखाली लाच मागणाऱ्यांपासून सावध राहा – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा इशारा

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव 

महावितरण कंपनीकडून ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलून त्याजागी नवीन स्मार्ट वीज मीटर बसवण्याचे काम एन.सी.सी. या एजन्सीमार्फत पूर्णतः विनामूल्य केले जात आहे. परंतु, या प्रक्रियेदरम्यान काही फसवणूक करणारे लोक मीटर टेम्परिंग, सील तुटणे, फोटो काढल्याचे कारण देत ग्राहकांना दंड, कारवाई वा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन लाच मागण्याचे प्रकार समोर येत आहेत.

या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी प्रेस नोट प्रसिद्ध करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जुने वीज मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर लावणे पूर्णतः विनामूल्य आहे. जुने मीटर महावितरण कार्यालयात जमा केली जातात. कोणतीही तक्रार नसताना टेम्परिंगचा आरोप करणे, दंडाची धमकी देणे हे गैरकायदेशीर आहे. महावितरणचे काही कर्मचाऱ्यांकडून अशा बनावट कारणांवरून मोठ्या प्रमाणात लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.याप्रकरणी तपास सुरू असून नागरिकांनी तत्काळ संपर्क साधावा.

अशी लाच मागणाऱ्यांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी या क्रमांकांवर तक्रार नोंदवावी –

📞 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव – 0257-2225477

📞 टोल फ्री क्रमांक – 1064

📞 पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर – 9404433931

विनामूल्य सेवा ही पैशांमध्ये विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. नागरिकांनी भीती न बाळगता संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

सादरकर्ते – श्री. योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!