कृतिशील तरुणाई शिबिराचे उत्साही उद्घाटन – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचा प्रेरणादायी संदेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

कृतिशील तरुणाई शिबिराचे उत्साही उद्घाटन – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचा प्रेरणादायी संदेश

सोलापूर/वर्षा चव्हाण

मोरवंची (जि. सोलापूर)प्रार्थना फाऊंडेशन आणि सेवादाई सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या कृतिशील तरुणाई शिबिराचे उद्घाटन दिमाखात पार पडले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार व त्यांच्या पत्नी रम्या कन्नन उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या वेळी बोलताना आयुक्त एम. राजकुमार यांनी उपस्थित तरुणाईला “नैराश्यात न जाता जिद्दीने संकटांना सामोरे जा व यश मिळवा” असा प्रेरणादायी संदेश दिला. “प्रत्येक संकटातून शिकून पुढे जाणे हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे,” असे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी प्रार्थना फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रम्या कन्नन यांनीही तरुणांना मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनदृष्टी याविषयी मार्गदर्शन करत स्वतःला सक्षम ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या शिबिराचे हे तिसरे वर्ष असून, महाराष्ट्रभरातून सामाजिक बांधिलकी असलेले, समाजात सकारात्मक बदल घडवू इच्छिणारे तरुण-तरुणी सहभागी झाले आहेत. शिबिराचा उद्देश केवळ व्यक्तिमत्त्व विकास नव्हे, तर समाजभान असलेली सक्षम पिढी घडवणे हा आहे.

उद्घाटनप्रसंगी प्रार्थना फाऊंडेशनच्या अनु मोहिते, प्रसाद मोहिते, शुभम मिसाळ, सेवादाई सोशल फाऊंडेशनचे विष्णू भोसले व साहिल तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाने उपस्थितांना सामाजिक प्रेरणा देत, नव्या उमेद आणि जिद्दीने भरलेला नवा अध्याय सुरू केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!