करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- किल्ला वेस येथील वेशीचे व बुरुजांच्या कामाची डागडुजी पुरातत्व विभागाने सुरू केली असल्याने आजपासून पुढील आठ ते पंधरा दिवस किल्ला वेस येथून नगरपालिकाकडे जाणारा रस्ता बंद राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सदर मार्ग पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी खुला असून वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.
तरी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.