रिक्षामधून दारूची अवैध वाहतूक; अमळनेर पोलिसांची धडक कार्यवाही..
अमळनेर: विक्की जाधव..
अमळनेरमध्ये अवैध रित्या दारूची वाहतूक करणाऱ्या रिक्षावरील छाप्यात पोलिसांनी १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना शहरातील मंगळग्रह मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ घडली.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना अमळनेर शहरातून पॅजो रिक्षामध्ये अवैद्य दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सदांनशिव, प्रशांत पाटील, उज्ज्वल म्हस्के, आणि निलेश मोरे यांचे पथकाने चोपडा रस्त्यावरील मंगळग्रह मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षावर धाड टाकली.
कार्यवाहीत रिक्षा चालक धनराज अशोक चौधरी (वय ४६, रा. अमळगाव, ता. अमळनेर) याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून खालील प्रकारच्या दारू जप्त करण्यात आली:
– मॅक्डोल व्हिस्की: २३,०४० रुपये (१४४ कॉटर)
– रॉयल स्टॅग: १८,२४० रुपये (९५ कॉटर)
– इम्पेरीयल ब्लु: ७,६८० रुपये (४८ कॉटर)
– रॉयल चॅलेंज: ९,१२० रुपये (४८ कॉटर)
– रिक्षा: ७०,००० रुपये
संपूर्ण मुद्देमाल एकत्रित १,२८,०८० रुपये झाला. हा माल प्रवीण काशिनाथ चौधरी (रा. अमळगाव, ता. अमळनेर) यांचा असल्याचे समजते. त्याच्या व रिक्षा चालकांवर पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसांत मुंबई दारूबंदी अधिनियम ६५ अ आणि ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.
या कार्यवाहीने अमळनेरमध्ये अवैध दारूविक्रीच्या विरुद्ध स्थानिक पोलिसांचा कठोर दृष्टिकोन स्पष्ट होतो आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा कार्यवाह्या आवश्यक आहेत.