धुवून वाळायसाठी टाकलेले कपड्याचे पाणी अंगावर पडल्याच्या कारणावरून;प्राणघातक हल्ला, भिगवण पोलीस स्टेशन मध्ये 4 व्यक्तींवर गुन्हा दाखल

अपनी भाषा में पढ़े! Translate

धुवून वाळायसाठी टाकलेले कपड्याचे पाणी अंगावर पडल्याच्या कारणावरून;प्राणघातक हल्ला, भिगवण पोलीस स्टेशन मध्ये 4 व्यक्तींवर गुन्हा दाखल

(निलेश गायकवाड)

भिगवण येथील मंगल दृष्टी अपार्टमेंट(शरदनगर )मध्ये शेजारी शेजारी राहणारे माडगे आणि जमदाडे यांच्या मधील कपडे वाळायला टाकलेल्या कपड्याचे पाणी अंगावर पडल्याच्या कारणावरून वाद हा विकोपाला पोहोचला. या वादाचे रूपांतर माडगे कुटुंबाच्या वतीने जमदाडे यांच्यावरती प्राण घातक हल्ला झाला. यामध्ये प्रामुख्याने अतिशय गंभीर अवस्थेमध्ये गणेश जमदाडे यांच्या वरती कोयत्याने वार झाल्याचे पोलीस कंप्लेंट मध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये ज्यांच्या वरती प्राणघातक हल्ला झाला. ते प्रामुख्याने गणेश जमदाडे राहणार मंगलदृष्टी अपार्टमेंट मध्ये राहत आहेत. ते प्रामुख्याने बकरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्याच अपार्टमेंट मध्ये शेजारी राहणारे विक्रम माडगे व त्यांची पत्नी रूपाली विक्रम माडगे व अज्ञात दोघेजण यांच्याविरोधात भिगवन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची फिर्याद यश गणेश जमदाडे यांनी.

या हल्ल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमदाडे यांना वार झाले असल्याने त्यांच्यावरती लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत. सदरील घटना ही 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 8.45 सुमारास पद्मावती डेअरी ते श्याम गार्डन कडे जाणाऱ्या रोडवरील पारस या किराणा दुकानासमोर सदरील घटना घडली. सदरील घटनेमध्ये यामागचे मुख्य कारण किंवा अजून यामध्ये कोणत्या तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागमुळे सदरील वाद एवढा विकोपाला गेला याची देखील तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. खाटीक समाजाच्या वतीने भिगवन बंदची पुकार घेतली होती पोलिसांच्या वतीने आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले. आरोपी अजून देखील अटक नाहीयेत आरोपी फरार असल्यामुळे भिगवण पोलिसांवरील ताण हा वाढलेला आहे. भिगवन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त व याबद्दल पुढील तपास पोलीस अधिकारी सुदर्शन साईदास राठोड यांच्याकडे आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!