भिगवण येथील हॉटेल व्यवसायिकाचा प्रामाणिकपणा दिसून आला; लाखोंची रक्कम भरलेली बॅग व महत्त्वपूर्ण कागदपत्रे

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण येथील हॉटेल व्यवसायिकाचा प्रामाणिकपणा दिसून आला; लाखोंची रक्कम भरलेली बॅग व महत्त्वपूर्ण कागदपत्रे

(निलेश गायकवाड)

माणसाच्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा दाखवायची कधी ना कधी वेळ व संधी ही चालून येते. ही संधी माणसाने नेहमी सकारात्मक ऊर्जा घेऊन प्रामाणिकपणा जोपासला पाहिजे. असाच प्रामाणिकपणा मदनवाडी येथील हॉटेल व्यवसायिक अन्नपूर्णा हॉटेलचे मालक व मदनवाडी गावचे रहिवासी प्रमोद बंडगर यांनी बँकेमध्ये असणारे लाख रुपये व त्याबरोबर असणारे महत्त्वपूर्ण कागदपत्र ही मूळ मालकाकडे देण्यात आली.

सविस्तर माहिती अशी रोजच्याप्रमाणे बंडगर यांनी आपल्या हॉटेल व्यवसायिकाची दिनचर्या सुरू ठेवली. समोरच एक चार चाकी वाहन येऊन हॉटेलमध्ये चहापान करून निघताना त्यांच्याकडे असणाऱ्या महत्वपूर्ण बॅगेची निष्काळजीपणा ठेवून ती बॅग त्यांच्याकडून जाताना रस्त्याच्या कडेला पडली. ही बाब बंडगर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या बॅगेकडे धाव घेत त्यातील महत्वपूर्ण कागदपत्र व रोख रक्कम ही त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या असणाऱ्या नंबर वरती संपर्क करून आपली कागदपत्रे व रक्कम ही सुरक्षित असल्याचे सांगितले. व त्यानंतर त्या मूळ मालकाने त्यांच्या नातेवाईक असणारे पत्रकार टिंगरे यांना बोलावून बंडगर यांच्याकडून ती बॅग घेण्यास सांगितली. यामध्ये प्रामुख्याने त्यामुळे मालकाचे नाव श्रीकृष्ण पांडुरंग चव्हाण यांचीही सर्व कागदपत्रे व रक्कम होती.

बंडगर यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे बक्षीस त्यांना देण्यात येत होते पण त्यांनी ते नाकारले. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे मदनवाडी परिसरामध्ये कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!