March 28, 2025 12:02 pm

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग, व्यापार, पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद; भाजपा महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प- धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग, व्यापार, पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद; भाजपा महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प- धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी

शिरपूर- विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व मतदान करत प्रचंड यश पदरात पाडणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटींची करण्यात आलेली तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवठ्यासाठी 7978 कोटींची तरतूद बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबूवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात 4300 कोटीचा बांबू लागवड प्रकल्प, शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी राज्यातील 5818 गावांमध्ये 427 कोटी रुपये किमतीची एक लाख 48 हजार 888 कामे हाती घेण्यात आली आहेत. असे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे आणि त्यासाठी 382 कोटी रुपये खर्च अपेक्षित करण्यात आला आहे तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण राज्य सरकार आखत आहे. शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यात याचा 50 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून येत्या दोन वर्षात यासाठी 500 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी म्हटले आहे. व राज्यातील आरोग्य, पर्यटन त्याचबरोबर पायाभूत सुविधा , मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, गडकिल्ल्यांचे संवर्धन, त्याचप्रमाणे औद्योगिक विकास यासाठी देखील महायुती सरकारने अंदाजपत्रकात भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्राला सर्व समावेशक विकास पथावर नेण्याचे कार्य या अर्थसंकल्पात आहे त्यामुळे मी या अर्थसंकल्पाचे , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून स्वागत करतो, असे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी म्हटले आहे.अशी माहिती भाजपा धुळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जितेंद्र जैन बंब यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!