शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजी-माजी संचालकांच्या मनमानी कारभाराला चाप….
बेकायदेशीर आणि नियमबाह्य पदभरती अखेर रद्द…
शिरपूर: शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजी-माजी संचालकांच्या मनमानी कारभाराला चाप बसला असून बाजार समितीत करण्यात आलेल्या बेकायदेशीर आणि नियमबाह्य पदभरती अखेर रद्द करण्याची नामुष्की संचालक मंडळावर ओढवली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लेखापाल या पदासाठी व दोन कनिष्ठ लिपिक या पदांसाठी भरती प्रक्रिया 2017 मध्ये राबविण्यात आली होती. यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पदभरतीसाठी लेखी परीक्षा देखील घेण्यात आली होती.
सदरच्या पदभरतीसाठी सहा सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. यात बाजार समितीचे चार व त्रयस्त दोन असे सदस्य नेमणूक करण्यात आले होते. त्रयस्त सदस्यांमध्ये श्री राजगोपाल भंडारी व श्री अनुप शिंपी CA यांचा समावेश करण्यात आला.जाहिराती नुसार एक जागा लेखापालसाठी शैक्षणिक पात्रता ,पदवीधर व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक अनुभव कोणत्याही सहकार व बँकींग क्षेत्रातील 5 वर्षे कामकाजाचा अनुभव आणि व कनिष्ठ लिपीक दोन जागासाठी शै.पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर , संगणकाचे चे ज्ञान आवश्यक अनुभव – कोणत्याही सहकार कींवा बँकीग क्षेत्रातील ३वर्षा पर्यंत कामकाजाचा आनुभव असणाऱ्यास प्राधान्य असे नमुद केले होते.जाहीरातील प्रसिद्धी प्रमाणे लेखापाल यापदासाठी २० व क.लिपीक पदासाठी ५८ अर्ज आले.मात्र या सर्व प्रक्रिया नंतर राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये लेखापाल पदासाठी स्नेहदिप जैन यांची निवड करण्यात आली होती. मात्र यांची ही निवड नियमबाह्य व निकष बाह्य असल्याने त्यावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. सदर भरती प्रक्रिया राबवतांना योग्य उमेदवाराची निवड न करता अपात्र उमेदवारांची भरती केली असे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १ व विशेष लेखापरीक्षक वर्ग २ यांनी 2021 – 22 व 2022 – 23 च्या लेखापरीक्षण अहवालात आक्षेप नोंदविण्यात आले होते. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी लिपिक पदासाठी पात्र 17 व लेखापाल पदासाठी सात पात्र उमेदवार होते.
सबंधित जैन क.लिपीकपदाचा अर्ज न भरता,परीक्षा न देता,तसेच मुलाखत न देता कनिष्ठ लिपीक पदासाठी बाजार समितीने विनंती अर्जावर निवड केली.म्हणजेच बाजार समितीने सदर जागेवर पात्र असलेल्या इतर उमेदवारांवर अन्याय केला.व बाजार समितीने त्याबाबत मा.जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था धुळे यांचे कडे खोटा व दिशाभुल करणार प्रस्ताव पाठवून मंजूरी देखील मिळवली. असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.
सदर बाबींवर जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १,सहकारी संस्था ,धुळे यांनी सन २०२१-२२या लेखापरीक्षण अहवालात नोंदवून सदरबाबतीत तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे असे देखील नमुद केले व त्याच प्रमाणे विशेष लेखापरीक्षक वर्ग२ सहकारी संस्था (फीरते पथक) धुळे सन.२०२२-२३च्या अहवालात सुध्दा सदर बेकायदेशिर व नियमबाह्य नियुक्ती बाबत गंभीर स्वरूपाचे आक्षेप नमुद केले आहेत.व तात्काळ कार्यवाही करणे बाबत नमुद केले व तात्काळ कार्यवाही न झाल्यास होणाऱ्या विलंबास बाजार समिती जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे नमुद केले होते.
त्यावर वरील दोन्हीही अहवालावर बाजार समितीने दोष दुरूस्ती अहवाल सादर केले.परंतु सदर नियुक्ती बाबतचा मुद्यावर अहवालात खुलासा समाधानकारक नसल्याने बाजार समितीने दिलेला खुलासा फेटाळण्यात येऊन आक्षेप कायम ठेवले. व लेखापरीक्षण अहवाला प्रमाणे कार्यवाही न झाल्यामुळे शेतकरी विकास फाउंडेशन चे ॲड.गोपालसिंग राजपुत व मोहन साहेबराव पाटील यांनी म.पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कडे कृषि उत्पन्न बाजार ,शिरपुर जि.धुळेचे सन 2021-22 व सन2022-23 या शासकीय लेखापरीक्षण अहवालात नमूद केल्या प्रमाणे संबंधित क.लिपीक याची बाजार समितीने बेकायदेशीर पणे नियुक्ती तात्काळ रद्द करणेबाबत दिनांक-5/8/2024 रोजी अर्ज दाखल केला.
सदर अर्जात..
1) सबंधित क.लिपीक यांची शैक्षणिक पात्रता नसतांना बेकायदेशिरपणे केलेली नियुक्ती व मान्यता रद्द करावी.
2.सबंधितांच्या नियुक्ती झालेल्या तारखेपासून ते नियुक्ती रद्द होई पावेतो संबधितांकडून पगाराची रक्कम व्याजासह तत्काळ वसुल करण्यात यावी.
3) लेखापरीक्षण अहवालात गंभीर दोष नमूद केलेले असतांना देखिल संचालक मंडळाने बेकायदेशिरपणे व नियमबाह्य नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यास कामावर ठेवून बाजार समितीच्या कर्तव्यात कसूर करुन बाजार समितीस आर्थिक नुकसानीस टाकल्यामुळे संचालक मंडळास जबाबदार धरुन संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली.
त्यावर सुनावणी होऊन दिनांक -27/1/2025 रोजी सदरचा नियुक्ती प्रस्तावास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांनी मंजूरी दिल्याने व सबंधित क.लिपीकाची कायमस्वरूपी नियुक्ती केलेली असल्याने जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था धुळे यांनी अर्जदार यांचे म्हणणे विचारात घेऊन कायदा,नियम व पोटनियमातील तरतुदीप्रमाणे योग्य तो निर्णय घेणे बाबत निर्देश दिले.सदर निर्देशा प्रमाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांचे पुढील सुनावणी होऊन कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन)नियम मधील तरतुदी नुसार शिरपुर कृषि उत्पन्न बाजार समिती शिरपुर चे कर्मचारी श्री. जैन क.लिपीक यांची कायमपदी नेमणूकीसदिलेली मान्यता रद्द केल्याचा आदेश 25 फेब्रुवारी 2025 रोजी दिला आहे.
अश्या पध्दतीने शेतकऱ्यांच्या हिताच्या संस्थावर कसा भोंगळ कारभार केला जात आहे.हे अनेकदा निदर्शनास आले आहे व येत आहे.तालुक्याचे नेतृत्व हे जाणिवपुर्वक लक्ष देत नाहीत का?हा संभ्रम देखील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.वास्तविक श्री राजगोपाल भंडारी हे शैक्षणिक संस्था मध्ये फारच काटेकोरपणे कामकाज करतात.आणि तालुक्याच्या नेतृत्वाच्या अत्यंत विश्वासाचे असा त्यांचा लौकिक आहे.शैक्षणिक संस्था मध्ये शिक्षक भरतीत फार मोठा अनुभव आहे.ते काटेकोरपणे भरती व ॲडमिशन प्रक्रिया राबवणारे म्हणून त्यांची ओळख आहे.असे असतांना मग शेतकऱ्यांच्या संस्था मध्ये शैक्षणिक अर्हता नसलेले निवड करण्यामागे त्यांचा हेतू काय? आणि बाजार समिती संचालक मंडळ हे अश्या निवडीला का संरक्षण देतात.हे देखील शेतकऱ्यांचे दुर्भाग्यच, संचालक मंडळात तर शेतकरी प्रतिनिधी पाठवले असतांना देखील त्यांना सदर शेतकरी संस्थांच्या हिताचे निर्णय का घ्यावेसे वाटत नाही.लेखापरीक्षण अहवालात गंभीर आक्षेप असतांना सदर बेकायदेशीर व नियमबाह्य निवडीवर तात्काळ निर्णय घ्यावासा संचालक मंडळाला का वाटत नाही.याचाच अर्थ असा होतो की शेतकरी संस्था संपवण्याचे कट कारस्थान तालुक्यात होत आहे .परंतु अश्या प्रवृत्ती शिरपुर शेतकरी विकास फाउंडेशन चालु देणार नाही. व बाजार समितीच्या या बेकायदेशीर निवडीने झालेले नुकसान सबंधितांकडून वसूल करून संचालक मंडळ अपात्र करणे पर्यंत हा लढा सुरूच राहील असे ॲड.गोपालसिंग राजपुत व मोहन साहेबराव पाटील यांनी कळविले आहे.