March 3, 2025 12:44 pm

डाॅ.राहुल कामडे यांना पी.एचडी प्रदान!

अपनी भाषा में पढ़े! Translate

डाॅ.राहुल कामडे यांना पी.एचडी प्रदान!

बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद महाविद्यालय व लिलाई हॉस्पिटल, बोराडी येथील प्रसूती तंत्र व स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ.राहुलकुमार रामकृष्ण कामडे यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पी.एच.डी. संपादन करून संस्थेच्या सन्मानात भर टाकली आहे. पी.एच.डी. करणारे ते या महाविद्यालयातील पहिले प्राध्यापक ठरले आहेत.

थोर स्वातंत्र्यसेनानी, आदिवासी मासिहा स्वर्गीय कर्मवीर आण्णासाहेब व्यंकटराव रणधीर संपूर्ण आयुष्यात शिक्षणाबरोबर तालुक्यातील लोकांचे आरोग्य कसे अविरत मजबुत राहील ह्याकडे सुद्धा तितकेच कटाक्षाने लक्ष ठेऊन होते व आदिवासी सामाजाचे आरोग्य त्यांच्यासाठी खूपच महत्वाचे होते त्यासाठी ते अनेक आजारी पिढीत लोकांना जीवनदान दिले होते अनेक रुग्णांना सेवा देत असे.
एके काळी त्यावेळी प्रसूती दरम्यान एका आदिवासी महिलेचा आरोग्यसेवेअभावी मृत्यू झाला ह्या मृत महिलेमुळे आण्णाबाबा खूपच हताश झाले होते म्हणे हे कायमचेच कसे थांबवता येईल त्यासाठी त्यांनी मार्ग काढायला सुरुवात केली व शेवटी त्यांनी वैद्यकीय सेवा देणारे महाविद्यालय म्हणून त्यांनी १९७२ ह्या वर्षी खान्देशातील पाहिले शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू केले त्यावेळी त्यावेळी पुण्यातील अनेक प्रस्थापित अधिकाऱ्यांनी आडकाठी केली पण कर्मवीर अण्णाबाबांनी दुर्दम्य प्रबळ इच्छाशक्ती व राजकीय पाठबळ वापरून उद्दिष्ट साध्य केले व आदिवासी समाजाला आरोग्यसेवा देण्याचे स्वप्न पूर्ण केले. आण्णाबाबांचा वसा पुढे सांभाळणारे एक शिलेदार आहेत डॉ.राहुल कामडे.!
आजपर्यंत ह्या रुग्णालयात अनेक विशेष प्रावीण्य प्राप्त सामाजिक जाण व होतकरू डॉक्टरांना अण्णाबाबांनी नेमले. महाराष्ट्रातील आयुर्वेदात विशेष प्रावीण्य संपादन केलेले अनेक प्रसिद्ध डॉक्टर्स आजपर्यंत ह्या महाविद्यालयात आदिवासी व गरीब लोकांसाठी आपली सेवा अविरतपणे बजावत आहेत. आण्णाबाबांचे स्वप्न पूर्ण करणारे व ह्या परिसरातील लोकांसाठी देवमाणूस म्हणून पुढे आलेले डॉ.राहूल कामडे हे एक आहेत त्यांनी केलेल्या सेवेचेच हे पी.एच.डी.रुपी फळ आहे.
भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) पुणे येथे २६ व्या पदवीदान समारंभात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांना पी.एच.डी पदवीने सन्मानित करण्यात आले.
बोराडी येथील आयुर्वेद महाविद्यालयात सहा वर्षांच्या संशोधन कार्यात त्यांनी १०७१ नवप्रसूत स्त्रियांवर मोफत औषधी उपचार करून एक नवीन कीर्तिमान प्रस्थापित केला आहे.
या यशाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे, विश्वस्त रोहित रंधे, शामकांत पाटील, धुळे-नंदुरबार ग.स बँकेचे संचालक शशांक रंधे, प्राचार्य डाॅ.राजेश गिरी, महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन शिरपूर व बोराडी परिसरातील नागरिकांनी डाॅ.राहुल कामडे ह्यांनी आदिवासी बहुल क्षेत्रात केलेल्या ह्या लोकाभिमुख यशस्वी कार्याबद्दल अभिनंदन केले आहे.!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!