माझ्या यशस्वी आंदोलनांची परंपरा
एक सिंहावलोकन
( दिलीप मालवणकर)
काल माझ्या एका सन्मित्राने तुम्ही रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन माझ्या ऐकिवात नाही असे म्हटले होते.त्याला उत्तर म्हणून हा जूना लेख पुन्हा पोस्ट करीत आहे.
सतत तीन वर्षे, मिंधें विरोधातील लेखणीची तलवार करून दिलेला एकाकी लढा, शाखा ताब्यात घेण्याला केलेला विरोध,उद्धव ठाकरेंचे अश्लिल व्यंगचित्र प्रसारित करणा-या विरोधात मी पुढाकार घेऊन दाखल केलेला गुन्हा, शिंदे समर्थक भूल्लर महाराज,सुशिल पवार व रमेश चव्हाण यांच्या विरोधातील एकतर्फी लढा यासारख्या अनेक प्रकारांनी मिंधे गटास जेरीस आणले हे का लक्षात आले नाही. डोळ्यावरील झापडं काढून मगच बोलावे; सन्मित्रांनी !
सुमारे पाच वर्षे मी उल्हासनगर महापालिकेतील एक बदमाश जनसंपर्क अधिकारी युवराज धोंडू भदाणे याच्या विरोधात अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या वतीने केलेल्या विविध आंदोलनांमुळे मी प्रथम चर्चेत आलो.परंतू ते काही माझे पहिले वहिले व एकमेव आंदोलन नव्हते. माझ्या आंदोलनांची
परंपरा १९७४ पासूनची आहे.आजवर मी जितकी सामाजिक आंदोलनं केली ती सर्व यशस्वी झालीत, हा इतिहास आहे. या भामट्या,बदमाश,बोगस,दरोडेखोर वृत्तीच्या व हिन मनोवृत्तीच्या युवराज भदाणे विरोधातील आंदोलन चिरडून टाकण्याचे स्वप्नं अनेक हितसंबंधित व पत्रकार पाहत होते मात्र ते यशस्वी करणे हे माझे “मिशन” होते.आजवर जगातील कोणतीही शक्ती मला खरेदी करू शकलेली नाही, मला माझ्या लक्ष्यापासून विचलित करू शकलेला नाही.
. मी गेल्या ५० वर्षांत केलेली सर्व आंदोलनं यशस्वीच झाली व कोणत्याही आंदोलनात समेट झालेला नाही, यासाठी मी १९७४ पासून केलेल्या आंदोलनाचा इतिहासच पुन्हा उगळत आहे. त्याला तो अंधभक्त पुन्हा स्वस्तुति म्हणेल पण त्याला माझा इलाज नाही. कारण मी जेव्हा ही आंदोलनं सुरू केली होती त्यानंतर २० वर्षांनी या युवा नेत्याचा जन्म झाला असावा. तर डोळे उघडून वाचा-
1. महाविद्यालयात असताना भारतीय विद्यार्थी सेनेचे काम करीत होतो. 1973 -74 सालातील गोष्ट. महाविद्यालयातील एक मराठी प्राध्यापक देवधर यांना CHM च्या जातीयवादी प्रशासनाने विनाकारण निलंबित केले होते.आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साखळी उपोषण करण्याचे ठरवले. मी ज्या दिवशी उपोषणास बसलो होतो त्याच दिवशी प्रशासनाने देवधर सरांचे निलंबन मागे घेतले.माझ्या मित्रांनी मला घरापर्यंत मिरवणूकीने आणले होते. हे माझे पहिले यशस्वी आंदोलन.
2. 1985 साली उल्हासनगरमधील VTC मैदानावर तेथील स्थानिक रहिवाश्यांनी अतिक्रमण केले होते.माझ्या नेतृत्वाखाली मैदान बचाव समितीची स्थापना झाली.मी सलग चार दिवस उपोषण केले.अखेर नागपुर अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले व तत्कालीन प्रशासक तानाजी सत्रे यांनी सदर अतिक्रमण उठविण्याचे आश्वासन दिले व उठवले देखील. तसेच तत्कालीन आमदार सितलदास हरचंदानी यांच्या आमदार निधीतून मैदानाच्या चौफेर संरक्षक भींत बांधून घेतली.
त्यामुळे हे मैदान वाचले. हे माझे दुसरे यशस्वी आंदोलन.
3.उल्हासनगरचे सिंधुनगर असे नामांतर करण्याचा घाट तत्कालीन खासदाराने 1990 साली घातला होता. शहर प्रमुख रमेश मुकणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती सभा उधळून लावली.त्यावेळी गोळीबार झाला होता व दंगलही उसळली होती.उल्हासनगरचे सिंधुनगर असे नामांतर रोखण्यात माझाही सहभाग होता. नंतर आमची निर्दोष मुक्तता झाली.
4. मासळी विक्रेत्यांवरील अन्याय रोखण्यासाठी मच्छी मार्केट बांधण्याच्या मागणीसाठी 1995 साली बेमुदत उपोषण केले. स्टेशन जवळ मच्छी मार्केट बांधुन घेतले. त्यांना त्रास देणा-या डाॅनला एमपीडीए कायद्याखाली एक वर्षं जेलमधे बसवले. मासे विक्रेत्यांसाठी मच्छी मार्केट बांधुन घेतले. आज २९ वर्ष झाली सुमारे ३० कुटुंबं येथे मासे विक्री करून उपजिविका करीत आहेत. हे माझ्या आंदोलनाचेच फलित आहे.
5. नॅशनल अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फसवणूक करणा-या संचालकांविरूद्ध 1987 साली 14 दिवस सर्वपक्षीय साखळी उपोषणाचे नेतृत्व केले व १०३ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवले. संस्थाचालक व प्राचार्या यांना अटक करून पोलीस कोठडी दाखवली. उच्च न्यायालयातून सदर महाविद्यालयाची मान्यता रद्द करून घेतली होती.माझ्यावर संस्थाचालकाने केलेल्या खोट्या खटल्यातून न्यायाधिशांनी मला निर्विवादपणे निर्दोष आरोपमुक्त करताना “संस्था चालकांनी पोलीसांशी संगनमत करून माझे आंदोलन दडपण्यासाठी खोटा गुन्हा नोंदवला,” असे निकाल पत्रात म्हटले होते.हे १०३ विद्यार्थी विविध शाळांतून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर अनेकजण सेवा निवृत्तही झाले.हे माझ्या आंदोलनाचेच फलित आहे.
5. पत्रकार अशोक बोधा यांच्या वरील हल्याच्या निषेधार्थ नागपुर येथे 1988 साली केलेल्या उपोषणात सहभाग.
उल्हासनगर महानगरपालिकेत पत्रकार कक्ष मिळण्यासाठी उल्हासनगर पत्रकार संघाचा अध्यक्ष व नगरसेवक या नात्याने यशस्वी नेतृत्व. महापालिकेत पत्रकारांना 1995 साली पत्रकार कक्ष मिळवुन दिला.
6. उल्हासनगर महानगरपालिकेच्या अनेक चुकीच्या निर्णयास विरोध करून ते बदलण्यास भाग पाडले. डि.जे.न
लावणा-या मंडळांना 2000 रूपये बक्षिसं देणे, थकित मालमत्ता करदात्यांच्या घरासमोर किन्नर नाचवणे, मालमता विभागातील 54 पावती पुस्तकं व 3 रजिस्टर गहाळ झाली होती ती परत शोधुन काढण्यास भाग पाडले. उल्हासनगर रेल्वे स्टेशन पश्चिम येथील बेकायदेशीर स्कुटर पार्किगकडे लक्ष वेधले व ते मुक्त करून घेतले.आत्ता महापालिका या मुक्त झालेल्या भूखंडावर मीनी बस सेवेचा डेपो सुरू करणार आहे.
7. महापालिकेने अट्टाहासाने काढलेल्या 6.5 कोटीच्या डस्टबीनच्या टेंडर मधे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.
अभूतपूर्व असे स्मशानभूमीत लाक्षणिक उपोषण केले,वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवुन भ्रष्टाचार रोखुन धरला. शहरातील कष्टकरी जनतेच्या कोट्यावधी रूपयांची बचत केली.हा लढा एकतर्फी झाला पण सर्वस्व पणाला लावुन यशस्वीपणे भ्रष्टाचा-यांना रोखून धरले.
त्यामुळे दरवर्षी साडे सहा कोटी व त्यात होणारी वाढ लक्षात घेता गेल्या ६ वर्षात महापालिकेचे ४२ कोटी वाचले, हे देखील माझ्या आंदोलनाचे मोठे व उल्लेखनीय यश आहे. या आंदोलनास विरोध करून टक्केवारी खाणारे नगरसेक कोण कोण होते ? याचे उत्तर त्या अंधभक्त युवा नेत्यास पचनी पडणार नाही.
8. महिला व बाल कल्याण समितीच्या
वतीने खरेदी केलेल्या 29 लाख 35 हजारांच्या डस्टबीन खरेदीतील ठेकेदार व भ्रष्ट अधिका-यांचे बिंग फोडले व उच्चस्तरीय चौकशीची करण्यास भाग पाडले. हाभ्रष्टाचार रोखला.
9. उल्हासनगर महापालिकेच्या ××× विभागातील अनेक गैरव्यवहार उघडकीस आणले. दरवर्षी निघणारी सुमारे १.१० कोटीची निविदा कायम स्वरूपी बंद करण्यास भाग पाडून महापालिकेचे आजवर साडेसहा कोटी रूपये वाचवले.अशाच पद्धतीने गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदीतील घोटाळ्यांना पटसंख्येच्या आधारे लगाम घालून महापालिका निधीची लूट रोखली. माझे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी काही बदमाश पदाधिकारी व पत्रकारांनी संगनमत करून माझी पत्नी अध्यक्ष असलेल्या महिला बचत गटाच्या शालेय पोषण आहारात उंदराची लेंडी टाकून बदनाम करण्याचा व बचत गटातील महिलांचा स्वयंरोजगार हिरावण्याचा असा दुहेरी गुन्हा केला. यात विद्यमान खासदार ही सामिल होता. या सर्वांना मी पुरून उरलो व तो कट असल्याचे सिद्ध करून लेंडीबाजांना चांगलीच अद्दल घडवली. हा भ्रष्टाचार कोण करीत होते ? त्याला कोणाचा वरदहस्त होता हे जाहिर करणे त्या युवा अंधभक्ताच्या गैरसोईचे ठरेल. माझ्यावर तोडबाजीचा निराधार आरोप करण्यापुर्वी त्याने १०० वेळा विचार करायला हवा होता.
10. सर्वात मोठा घोटाळा म्हणून ज्याचा उल्लेख करावा लागेल तो फुटबॉल स्पर्धेतील घोटाळा.ज्यात ठेकेदाराने फसवणूक करून काम मिळवले व प्रचंड दर आकारले होते.हे प्रकरण उघडकीस आणल्याने महापालिका हादरून गेली.अखेर प्रशासनाने मंजूर झालेली बिलं रोखुन धरली व चौकशी केली. ती ३९लाखाची बिलं ठेकेदारास अद्याप मिळालेली नाहीत.
11. उल्हासनगर महापालिकेच्या वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे विरोधात पाच-सहा वर्षे नेटाने आंदोलन करून त्याला कायमस्वरूपी बडतर्फ करायला भाग पाडले, भदाणे याच्या पदोन्नतीस 16 आमदार, 96 टक्के लोकप्रतिनिधींचा पाठींबा असताना मी निकराचा विरोध केला होता. त्याचा अनागोंदी कारभार, गुन्हेगारी प्रवृत्ती उघडकीस आणली. 16 आमदारांनी पदोन्नतीसाठी शिफारस केल्याने त्यांच्या विरोधात राज्यपाल महोदयांकडे तक्रार केली असता उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. नंतर या समितीने भदाणेस पदोन्नतीसाठी अपात्र ठरवले होते.या वेळीही भदाणेचे पाठीराखे कोण होते ? याचा त्या अंधभक्त युवा नेत्याने शोध घ्यावा.
12. मी महापालिकेच्या ताबोर आश्रम येथील कोविड हाॅस्पिटलला कडाडून विरोध केला. त्यामुळे प्रशासनाने सदर प्रस्ताव रद्द केला आहे.त्यामुळे महापालिका हद्दीबाहेर व एका धार्मिक संस्थेस लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
13. महापालिकेच्या स्थायी समितीत कोविड हाॅस्पिटलसाठी अवाजवी दराने वैद्यकिय उपकरणे व अन्य साहित्य खरेदी करण्याचा घाट रचला गेला आहे,असे कळतीच स्थायी समितीच्या सभेच्याच दिवशी या प्रकरणी आवाज उठवताच तो डाव फसला व कित्येक कोटी वाचले.
14. उल्हासनगर महापालिकेत तीन वर्षांपुर्वी नामंजूर केलेली १५ कोटीची ५:२:२ अंतर्गत बेकायदेशीर कामांची बिलं अधिकारी,ठेकेदार व लोकप्रतिनिधींनी संगनमताने अदा करण्याची जय्यत तयारी केली होती.टक्केवारी देखील जमा करण्यात आली होती परंतू मी या सर्व कटाचा गौप्यस्फोट केल्याने महापालिकेची १५ कोटींची लूट रोखण्यात यश मिळवले.
तसेच मिंधेनी गद्दारी केली असता उघडपणे बोलण्याचे विरोध करण्याचे धाडस एकाही स्थानिक नेत्यात नव्हते. उलट अंतर्गत छुपा समझौता करून काहीजण घरभेदीपणा करण्यात धन्यता मानत होते व निष्ठावंतांचे खच्चिकरण करीत होते. गेल्या सुमारे दोन वर्षात एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात राहून त्याच्या विरोधात प्रखर व निर्भीड लेखणी व वाणीने विरोध करताना मी जीवाची पर्वा केली नाही. या उलट पदं उबवणारे अनुपस्थित राहून व प्रसिद्धी माध्यमांत तोंड लपवून बसले होते. मला धमक्या आल्या,मिंधे गटाच्या एका पदाधिका-याने खोटा गुन्हा दाखल करून पाहिला परंतू मी त्याचीच पार वाट लावून टाकली.
यातील एकही शब्द अतिशयोक्तीपूर्ण नाही,याची मी ग्वाही देतो.ही आंदोलनं करताना काही अपवाद वगळता मला संबंधितांनी एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला.पण माझ्या सच्चाई व चिकाटीमुळे सर्वच प्रकरणात यश मिळाले,ही जमेची बाजू आहे. यावेळी अनेक मित्र दुखावले गेले, हितशत्रूत वाढ झाली पण जनमानसात जे आदराचे व विश्वासाचे स्थान संपादन करू शकलो त्यापुढे सर्व काही नगण्य वाटते.
याशिवाय टाउन हाॅलचे आंदोलन, मलंगगड आंदोलन,पत्रकारांची आंदोलनं व शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन शहराची बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत आलो आहे व तो अव्याहतपणे सुरूच राहिल.जे येतील त्यांना बरोबर घेऊन व जे आडवे येथील त्यांना ओलांडून ही वाटचाल सुरूच राहिल.
दिलीप मालवणकर
9822902470
हा लेख जुनाच आहे तो अद्ययावत केला आहे.