एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एआईसीटई कडून मिळालेल्या मोड्रोब या प्रयोगशाळेचे उदघाटन..
इंदापूर प्रतिनिधी- आदित्य बोराटे
एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एआईसीटई कडून मिळालेल्या मोड्रोब या रिसर्च ग्रँट च्या माध्यमातून मिळालेल्या प्रयोगशाळेचे चे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सचिव भाग्यश्री पाटील यांचा हस्ते करण्यात आले.
या रिसर्च प्रपोजल माध्यमातून एआईसीटई काढून १५७३६०० रुपये निधी मंजूर झाला होता. एकूण २९५३००० रुपयाची रिसर्च लॅब तयार केली. या रिसर्च लॅब च्या माध्यमातून सिव्हिल इंजिनिअरिंग साठी लागणारे मातीचे परीक्षण करण्यात येईल अशी माहिती प्रयोगशाळा प्रमुख मंजुश्री घोगरे यांनी दिली. त्या रिसर्च लॅब साठी सिव्हिल विभाग प्रमुख प्राध्यापक राम घोगरे व विभगातील सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना व आसपास च्या स्थापत्य व्यावसायिकांना होईल.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. शिरकांडे यांनी कौतुक करून प्रोत्साहन दिले तसेच या निम्मिताने संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील- ठाकरे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.