शिरपूर – येथील महात्मा ज्योतिबा फुले मल्टी टेक्निकल माध्यमिक विद्यालयात संत गाडगे बाबा जयंती व सौ. सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक व क. स. बर्वे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नवनियुक्त प्राचार्या सौ. सारिकाताई रंधे यांचा सत्कार समारंभ साजरा करण्यात आला. जयंती व सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी युवकांचे प्रेरणास्थान, शिक्षक नेते, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव नानासाहेब निशांतराव रंधे होते. शालेय समिती चेअरमन तथा किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त डाॅ. जितेंद्र चित्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभ साजरा झाला.

फुले विद्यालयाच्या वतीने समारंभाचे अध्यक्ष नानासाहेब निशांतराव रंधे यांचा सत्कार मुख्याध्यापक प्रल्हाद सोनार यांनी व सत्कारमुर्ती सौ. सारिकाताई रंधे यांचा सत्कार जेष्ठ शिक्षिका एस. एल. पाटील यांनी केला. सत्कारास उत्तर देताना सारिकाताई रंधे यांनी संत गाडगे बाबांचे प्रखर विचार आणि कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटरावजी रणधीर यांनी दिलेल्या शिक्षण संस्कारावर मार्गदर्शन केले. समारंभाचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव नानासाहेब निशांतराव रंधे यांनी फुले विद्यालयाचे गतवैभव, गौरवशाली परंपरा सांगताना विविध स्तरावर विद्यालयाचा नावलौकिक कसा वाढेल यावर मार्गदर्शन करुन सत्काराबद्दल आभार व्यक्त केले. समारंभाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद सोनार यांनी केले. उपशिक्षिका सोनाली बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. समारंभाचे सूत्र संचालन जितेंद्र गोसावी यांनी व आभार प्रदर्शन सचिन कुमावत यांनी केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. बी. पाटील, उपशिक्षक आर. व्ही. चव्हाण, आर. एम. बारी, डी. एन. पाटील, व्ही. एस. मोरे, निता एम. पाटील, ज्योती एस. गिरासे, विनिता सी. पाटील, इंदिरा पावरा, एल. वाय. पाटील, धिरज पाटोळे, निलेश महाजन, हेमंत शेटे, संजय कुवर, जे. एस. पराडके, बी. एस. कोळी, ग्रंथपाल दिलीप सगरे आणि शिक्षकेतर कर्मचारी वाल्मिक वाघ, पद्माताई बाविस्कर, कैलास बारेला, निळकंठ पाटील यांनी परिश्रम घेतले.