कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा मंगळवार १ मार्च रोजी बार्शी- कुर्डूवाडी रोडवर रिधोरे येथे रस्ता रोको आंदोलन करणार…
प्रतिनिधी:- अजिनाथ कनिचे
महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या विजबिलासंदर्भातील
शेतीपंपाची अचूक बिले कोणत्याही शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. वास्तविक विद्युत कायदा २००३ कलम ५५ नुसार वीज वापराचे अचूक देयक शेती पंप ग्राहकाला मिळणे हा त्याचा अधिकार आहे.तसेच वीज वापर देयक अचूक नसेल तर चुकीचे देयक देऊन वसुली करणे हे बेकायदेशीर आहे.केंद्र व राज्य सरकारच्या अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ कलम १६ यामध्ये अन्नसुरक्षेचे संकट उभे राहू नये म्हणून कोणत्याही स्थितीत शेतीपंपाचा वीज पुरवठा तोडला जाणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.विद्युत कायदा २००३ कलम ५५ नुसार अचुक वीज वापर देयक न देता बेकायदेशीर वसुली करणे व अन्नसुरक्षा अधिनियमातील तरतुदी कडे दुर्लक्ष करून शेती पंपाचा वीज पुरवठा तोडणे या बेकायदेशीर बाबी आम्ही आपणांस नम्रपणे या निवेदनाद्वारे समोर आणून देत तातडीने राज्यातील सर्व वीज वितरण अधिकारी कार्यालय यांना आदेश देऊन शेतीपंप वीज पुरवठा तोडण्याचे बेकायदेशीर काम थांबवण्यास भाग पाडावे.व तोडलेले कृषीपंपाचे वीज कनेक्शन पूर्ववत जोडून देण्याचे आदेश द्यावेत.वीज वापरबिलाची वसुलीसाठी शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित करणे अथवा शेती पंप विज कनेक्शन तोडणे हा काही उपाय नसून कायद्यात सुद्धा अशी तरतूद नाही.
कृषी पंप धारकांना १५ दिवस अगोदर नोटीस देणे कायद्याने बंधनकारक असताना महावितरणने कोणतीही नोटीस न देता अचानकपणे कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. तो ताबडतोब तात्काळ चालू करावा.
विषय:-
१) कृषीपंपासाठी दिवसा १० तास उच्चदाबाने वीज पुरवठा द्यावा.
२)कृषीपंपाचे विजबिल मीटर प्रमाणे द्यावे.
३) अतिवृष्टी व दुष्काळ पडला असताना त्या काळातील कृषी पंपाचे विजबील कमी करावे.
४) महावितरण कंपनीने शेतकर्यांना त्यांच्या परस्पर वाढवलेले H.P. व वाढीव बिल कमी करून मूळ H P प्रमाणे अचूक बिल द्यावे.
५) विद्युत रोहित्र (ट्रांसफार्मर) जाळल्यानंतर ४८ तासांच्या आत तो चालू करण्याचे कायद्याप्रमाणे हमीपत्र द्यावे.
६) कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तारा, पोल,ट्रांसफार्मर,विजवाहन करणाऱ्या साधनांच्या संदर्भातील शेतकऱ्यांना देय असलेले भाडे आजपर्यंत मिळालेले नाही ते त्वरित द्यावे.
७) महाराष्ट्र शासनाकडून कृषी पंपाच्या संदर्भात (एचपीप्रमाणे) आजपर्यंत आपणांस किती अनुदान मिळाले आहे व आपण शेतकऱ्यांना किती तास कृषिपंपांची वीज देता ते मिळालेले अनुदान वजा करून बिल अदा करण्यात यावे.
शेतकऱ्यांनी अन्ननिर्मितीचे कर्तव्य बजावत असताना कोविड-१९ संसर्गाने प्राणाला सुद्धा मुकावे लागले आहे.गेल्या दोन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना अतोनात आर्थिक नुकसान सोसावे लागून सुद्धा त्याने अन्ननिर्मितीचे राष्ट्रीय कर्तव्य चोखपणे बजावलेले आहे. तरी वरील निवेदनाचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा आपणच सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.
असे निवेदन मा.उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी,कुर्डूवाडी येथे देण्यात आले. यावेळी आजिनाथ परबत जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवाजी पाटील जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष वामन भाऊ उबाळे, गोरख उबाळे, राजेंद्र शिंदे प्रहार शेतकरी संघटना माढा तालुका अध्यक्ष, शांतीलाल गवळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष, गणेश परबत, तुकाराम गवळी, अमोल गवळी, सुरेश बोरकर, राजेंद्र भोसले, महादेव भोसले, पांडुरंग गवळी, बालाजी गवळी, नामदेव खारे, अभिजित परबत, अजित खबाले, बळीराम काळे, विक्रम गवळी, पृथ्वीराज गवळी व तांदुळवाडी, रिधोरे, म्हैसगाव, पापनास व अंजनगाव इत्यादी गावातील शेतकरी उपस्थित होते.