March 3, 2025 9:53 am

प्रताप महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार (IPR), पेटंट व ट्रेडमार्क या विषयावर श्री निलेश पंडित यांचे व्याख्यान संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार (IPR), पेटंट व ट्रेडमार्क या विषयावर श्री निलेश पंडित यांचे व्याख्यान संपन्न.

 

अमळनेर: विक्की जाधव

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात 22 फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता पूज्य साने गुरुजी सभागृहात सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानतर्फे प्रायोजित बौद्धिक संपदा अधिकार, पेटंट व ट्रेडमार्क” या विषयावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पुणे येथील पेटंटचे कायदेशीर सल्लागार श्री. निलेश पंडित यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात मान्यवर अतिथींचा सत्कार अमळनेरच्या प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. ए.बी. जैन यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष समन्वयक डॉ. मुकेश भोळे, आणि परीक्षा नियंत्रक प्रा. शशिकांत जोशी उपस्थित होते. प्रा. हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि अतिथींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शशिकांत जोशी यांनी केले.

राज डिजिटल फोटोग्राफी मो. 9175050300

मुख्य वक्ता श्री. निलेश पंडित यांनी व्याख्यानाची सुरुवात करतांना विद्यार्थ्यांना Invention आणि Discovery यामध्ये फरक समजावून सांगितला. त्यांनी कॉपीराइट पेटंट, आणि ट्रेडमार्क यांचे स्वरूप आणि उपयोगांचे महत्त्व विविध मनोरंजक उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.

श्री. पंडित यांनी स्पष्ट केले की, नाविन्यपूर्ण संशोधनासाठी पेटंट घेता येते आणि त्याचे सर्व हक्क सरकार नोंदणीपासून 20 वर्षांपर्यंत त्या व्यक्तीला प्रदान करतात. त्यांनी असेही सांगितले की, एखादा व्यवसाय सुरू करताना विशिष्ट नाव व चिन्हाचे ट्रेडमार्क घेणे आवश्यक आहे, जेणेकरून दुसऱ्याला ते वापरता येणार नाही.

कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. विजय तुंटे, डॉ. कल्पना पाटील, डॉ. व्ही.बी. माँटे, डॉ. योगेश तोरवणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी केले, ज्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे वित्तीय व बौद्धिक चर्चा आणि ज्ञानवृद्धीसाठी एक महत्त्वपूर्ण मंच ठरला.

या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वर्धन होणे अपेक्षित असून त्यांच्या भविष्यातील करियरसाठी मार्गदर्शक ठरावे, अशी अपेक्षा आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!