March 3, 2025 7:41 pm

कर्मवीर बाबांनी रोहिणी गाव दत्तक घेऊन आदर्श गाव केलं…

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्मवीर बाबांनी रोहिणी गाव दत्तक घेऊन आदर्श गाव केलं…

       विद्यार्थ्यांची गुणवत्ता कुठेही कमी पडता कामा नये – निशांत रंधे…

        बोराडी ता.शिरपूर ज्या विद्यार्थ्यांना आज बक्षीस आमच्या आतून मिळणार आहेत. त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करेलच परंतु ज्यांना बक्षीस मिळाले नाही. त्यांचं अभिनंदन करेन , त्या मुलाकडे त्या मुलीकडे बघून आम्हालाही पारितोषिक प्रथम क्रमांकाचे कसे मिळेल याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. कर्मवीर बाबांनी रोहिणी गाव दत्तक घेऊन एक आदर्श गाव कसे होईल याकडे जीवापाड लक्ष दिले होते. त्यांच्याच विचारांनी आम्ही देखील सर्व भावंड वेळेला रोहिणीला येतो त्यावेळेला एक आदर्श रोहिणी गाव आमच्या डोळ्यासमोर असते आणि त्या आदर्शच्या भावनेतून आम्ही या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतो तीच शिकवण आमच्या या शिक्षक बंधू भगिनींना आम्ही देत असतो की विद्यार्थ्यांची गुणवत्ता कुठेही कमी पडता कामा नये, ग्रामीण भागातला विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जाण्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी रोहिणी येथील बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.

रोहिणी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णाकुंभार माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती कैलास पावरा, पंचायत समिती सदस बागल्या पावरा, शालेय समिती अध्यक्ष बन्सीलाल बंजारा, भोईटी ग्रामपंचायत सरपंच दीपक पावरा, खामखेडा ग्रामपंचायत सरपंच ऋषिकेश पावरा, रोहिणी ग्रामपंचायत उपसरपंच बसंतजी पावरा, भाजपा तालुका उपाध्यक्ष पिंटू बंजारा, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद बंजारा ,भिकन बुवा, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिल पावरा, वनविभागाचे वनपाल शितल माळी, माजी मुख्याध्यापक के ,डी चौधरी, केंद्रप्रमुख राजेश राठोड, ठाकूर सर ,सोनवणे सर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी.डी.सोनार यांनी शाळेच्या विकासासाठी व झालेला विकासावर प्रकाश टाकीत पुढील शैक्षणिक वर्षात याहून अधिक विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. तसेच डॉ.सुनिल पावरा यांनी सांगितले की, मुला व मुलीमध्ये भेदभाव न करता मुलांना उच्च शिक्षित करा व आपले कुटुंब आपण दोन आपले दोन असे सुखी परिवार ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

या पारितोषिक वितरण समारंभात वर्षभरात विविध उपक्रम राबवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आदर्श विद्यार्थी म्हणून महेंद्र दिलीप भील याला शाळेच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. त्या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यात लहान गटात वकृत्व स्पर्धेत प्रथम हर्षदा बंजारा, व्दितीय स्वाती बंजारा, तृतीय केशव बंजारा तर मोठ्या गटात प्रथम पूजा बंजारा, व्दितीय पायल बंजारा, तृतीय नम्रता बंजारा, तसेच शिक्षक दिनानिमित्त वकृत्व स्पर्धेत प्रथम अजय पावरा, द्वितीय सागर बंजारा ,तृतीय स्वाती ढिवरे, तर वेशभूषा कार्यक्रमात प्रथम अजय कोळी द्वितीय मयूर भिल तृतीय हर्षदा पवार उत्तेजनार्थ ललित पवार यांना बक्षीस देण्यात आले.

आनंद मेळावा अंतर्गत विविध स्पर्धेत लहान गट संगीत खुर्ची प्रथम दुर्गेश पावरा द्वितीय ओम पवार तृतीय हर्षदा पवार मोठ्या गटात प्रथम गौरव बंजारा, व्दितीय राधिका पावरा ,तृतीय महेंद्र भिल, तर लिंबू चमचा शर्यतीत प्रथम रिंकू पावरा, द्वितीय संध्या पावरा, सपना बंजारा, तृतीय ज्ञानेश्वर बंजारा, तसेच गाढवाला शेपूट लावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मयूर भिल याने पटकावला.

शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचा देखील या प्रसंगी गौरव करण्यात आला यात सुरेश पावरा, निकिता पवार, कामिनी बंजारा, दुर्गेश बंजारा, अरुण पावरा, तर मार्च-२०२४ मध्ये झालेल्या माध्यमिक दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक कीर्ती पवार तर द्वितीय क्रमांक शिवानी बंजारा हिने मिळविला होता. तसेच व व्यंकटेश क्रिडा व कला महोत्सवात 100 मीटर रेल्वे मध्ये प्रथम संदीप पावरा, सागर बंजारा, महेंद्र भील, दीपक पावरा यांनी मिळवला होता. तर 200 मीटर मध्ये संदीप पावरा ,अर्जुन पावरा, गणेश पावरा, तर लांब उडी हर्षाली पावरा तसेच खो-खो स्पर्धेत उपविजेता ठरलेला संघात दीपक पावरा, शिवम पावरा, रोहित पावरा, राहुल पावरा ,राकेश पावरा तर मुलींच्य संघात राधिका पावरा, रोशनी पावरा ,संध्या पावरा ,हर्षाली पावरा ,मोनिका बंजारा, राधिका पावरा, शारदा पावरा, दिपाली पावरा, वंदना पावरा, अमृता पावरा ,रिंकू पावरा ,सुशीला पावरा, चिका पावरा ,राणी बंजारा, यांनी बहुमान मिळवला होता. त्याचबरोबर तालुका विज्ञान प्रदर्शनात महिंद्र भील व ओम कोळी यांनी सहभाग नोंदवून शाळेचे नाव लौकिक केल्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बागुल, योगेश गुरव, हिम्मतराव शिरसाठ व आभार प्रदर्शन नितीन शिंदे यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वीसाठी श्रीमती वर्षा पाटील, मीरा सुळे, रोहिदास पावरा, रत्नाकर सूर्यवंशी, विजय बागुल, योगेश गुरव, हिम्मतराव शिरसाठ, सुनील राठोड, राकेश डुडवे, अंबादास सगरे, भूषण भोई, नितीन शिंदे, संजय वाघ, गणपत शिरसाठ,संजय तिरमले, राहुल खैरनार, इंग्लिश स्कूलचे रीना जाधव व भारती पवार आदींनी श्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!