June 29, 2025 7:52 am

समाज सुधारक संत गाडगे महाराज: प्रा. डॉ. एल.ए. पाटील लिखित ‘डेबुजी ते महात्मा’ पुस्तकाचे प्रकाशन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

समाज सुधारक संत गाडगे महाराज: प्रा. डॉ. एल.ए. पाटील लिखित ‘डेबुजी ते महात्मा’ पुस्तकाचे प्रकाशन..

 

अमळनेर : विक्की जाधव..

अमळनेरमध्ये संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारधारेपासून प्रेरित होऊन, प्रा. डॉ. एल.ए. पाटील लिखित ‘डेबुजी ते महात्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन म.वा. मंडळाचे अध्येक्ष डॉ. अविनाश जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या विशेष कार्यक्रमात अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेशजी माने, अमळनेर नगरपालिकेचे माजी नगरसेवक परशुराम महाले, सामाजिक कार्यकर्ते सुरज परदेशी, युवा परीट मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव, उपाध्यक्ष उमेश वाल्हे, कार्याध्यक्ष विनोद जाधव, तालुकाध्यक्ष गंगाराम वाल्हे, तसेच विविध सामाजिक मंडळांचे प्रमुख उपस्थित होते.

 लग्न समारंभ आणि इतर शुभ कार्यासाठी

राज डिजिटल फोटोग्राफी  9175050300

कार्यक्रमाच्या प्रारंभात, प्रा. रमेशजी माने यांनी प्रास्ताविकात संत गाडगे महाराजांच्या कार्याचं महत्त्व स्पष्ट केले. या पुस्तकात त्यांनी समाजातील जातीपातीचे भेद,शिक्षणावरचे महत्व, आणि आपले सामाजिक दायित्व याबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले.

साक्षरता आणि शिक्षण:

शिक्षणाचं महत्व वाढवून समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवता येईल, या मुद्द्यावर उपस्थितांनी विचारमंथन केले. पुस्तकं प्रकाशणाच्या माध्यमातून नवीन पिढीला याचा लाभ होईल?” या संदर्भात, प्राध्यापकांनी स्थानिक शालेय अभ्यासक्रमात गाडगे महाराजांच्या शिकवणींचा सरांश देऊन नवीन पिढीस गाडगे बाबा चे चरित्र समजा समोर आणण्याची जानकरांनी आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक वाल्हे यांनी केले आणि त्यांनी उपस्थितांना पुस्तकाच्या मुख्य मुद्द्यांची माहिती दिली.

या प्रकाशनाने स्थानिक समुदायात एक जिवंत संवाद साधला आहे. यामुळे संत गाडगे महाराज यांच्या कार्याची महत्ता आणि त्यांची सामाजिक न्यायाची शिकवण अधिक जनसामान्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.

याशिवाय, अमळनेरच्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यातून या उपक्रमाला पाठिंबा दिला. गाडगे बाबा यांचे जयंती चे निमित्त साधत यावेळी सर्व समाज बांधवांचा समावेश होता, ज्यांनी आपल्या समर्थनाने कार्यक्रमाला एक वेगळा रंग दिला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!