अमळनेर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
अमळनेर : विक्की जाधव..
दरवर्षीप्रमाणे अमळनेर येथे युवा परीट मंडळ आणि परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम आणि मिरवणूक हीं वाडी संस्थानपासून सुरू होऊन पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, मार्गे तिरंगा चौक, संत गाडगेबाबा चौक आणि संत गाडगेबाबा उद्यानापर्यंत होती.
लग्न समारंभ आणि इतर शुभ कार्यासाठी
राज डिजिटल फोटोग्राफी, संपर्क
917 505 0300
यावेळी असंख्य महिला पुरुष विविध समाज बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबांची मूर्तीचे पूजन आणि माल्यार्पण करून झाली. यावेळी प्रा. डॉ. एल ए पाटील, अमळनेर चे सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ञ अविनाशजी जोशी, आणि प्रा. डॉ. रमेशजी माने यांची विशेष उपस्थिती होती.
आ. अनिल पाटलांनी दिली भेट :
पानखिडकी भागात माजी मंत्री आमदार दादासो अनिल पाटील यांनी मिरवणुकीस सदिच्छा भेट देऊन संत गाडगेबाबा यांच्या पूजन आणि माल्यार्पण करून बांधवांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकात दिपक वाल्हे व राकेश परदेशी यांनी सपत्नीक आरती केली. तर या भव्य जयंती उत्सवात, दिपक वाल्हे, अनिल वाघ, गंगाराम वाल्हे, मधुकर निंबाळकर, आणि रवींद्र जाधव यांच्या योगदानाने मिरवणूक मार्गावर विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या, ज्यामुळे परिसर सुशोभित झाला.
संत गाडगेबाबा उद्यानात अनिल जाधव आणि चंदू परदेशी यांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
याबरोबर, उपस्थित लोकांची मोठी गर्दी होती, ज्यामध्ये स्थानिक नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला. या विशेष कार्यक्रमाने समाजात धार्मिकता, एकता आणि परंपरेचे महत्त्व पुन्हा एकदा प्रदर्शित केले.
गाडगेबाबांच्या विचारधारेच्या आणि कार्याच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या जयंती उत्सव मिरवणूकित उपस्थितांना प्रेरणा मिळाली,यावेळी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला, जो भविष्यातील यशस्वी सांस्कृतिक वारसा निर्माण करण्यास मदत करेल.