बोराडी फार्मसी क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव व महाविदयालयाच्या संयुक्त विदयामाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्या अंतर्गत एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन
बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) बोराडी फार्मसी क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव व महाविदयालयाच्या संयुक्त विदयामाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्या अंतर्गत एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन
किसान विदया प्रसारक संस्थेचे इंन्स्टीटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी ता. शिरपुर जि. धुळे. येथे क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव व किसान विदया प्रसारक संस्थेचे इंन्स्टीटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी यांच्या संयुक्त विदयामाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्या अंतर्गत एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाचे उद्घाटन क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव सायन्स व टॅक्नॉलॉजी अधिष्ठाता डॉ. शंकर एस. राजपुत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी अंतर औषध वितरण प्रणालींसाठी नॅनोटेक्नॉलॉजीमधील नवोपक्रम: औषधनिर्माणक्षत्रातील उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना जोडणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रे घेण्यात आली या सत्रांचे मार्गदर्शन अनुक्रमे मा. बाजीराव ढेपे (डीजीएम, हेड ऑफ क्वालिटी मायलन मर्जर फायजर, नाशिक) , डॉ. प्रकाश एन. केंदे् (उपप्राचार्य राजश्री शाहु कॉलेज ऑफ फार्मसी, बुलडाणा) डॉ. मयंक शर्मा (प्राध्यापक, एन.एम.आय.एम.एस.शिरपुर) आणि डॉ. युवराज सातकर (डायरेक्टर, फाउंडर ओमसिंथ लाईफ सायन्स एम.आय.डी.सी.नरडाणा) यांनी केले.
सदर कार्याक्रमाचे एकूण चार सत्र घेण्यात आले चारही सत्रामध्ये विद्यार्थ्यांना नॅनो टॅक्नॉलॉजी मधील नविन कल्पना बरोबर औषध वितरण प्राणाली उदयोग आणि औषधनिर्माणशास्त्र शिक्षण प्राणलिमध्ये कसा वापर केला जाईल याबदल मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमासाठी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही पाटील, उपप्राचार्य प्रा. कल्पेश वाघ यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. गौरव एस.पाटील होते तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविदयालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परीश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाबददल किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव श्री. निशांत रंधे, खजिनदार ताईसो आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच श्री. राहुल रंधे, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. शशांक रंधे, नगरसेवक श्री. रोहीत रंधे यांनी कौतुक केले.