शिरपूर येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न….
“खेळामुळे चारित्र्य, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण होतो” – आशाताई रंधे…
बोराडी ता. शिरपूर (वार्ताहर) खेळामुळे चारित्र्य, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण होतो. विद्यार्थ्यांना बाल वयात खेळाचे गंध लागले पाहिजे यामुळे बौद्धिक विकासाबरोबर मैदानी खेळाचे अनेक फायदे असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कर्मवीर अण्णा बाबांचा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वारसा असाच पुढे नेत राहू असे अश्वसित किसान विद्या प्रसारक संस्थेचे खजिनदार आशाताई रंधे यांनी शिरपूर येथील इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्डूडन्स स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.
शिरपूर येथील इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्डूडन्स स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत जी रंधे, माजी नगरसेवक रोहित रंधे, यांच्या हस्ते झाले होते, या भव्य स्पर्धेत राज्यभरातील 24 संघांनी सहभाग घेतला होता. खेळाडूंमध्ये जिद्द, आत्मविश्वास आणि विजयाची तीव्र इच्छा दिसून येत होती. उद्घाटन समारंभात क्रीडाप्रेमी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हॉलीबॉल गटात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, आर्वी (जि. वर्धा) संघाने उत्कृष्ट खेळ करत , 4 _ 1 डावाने के. जे. सोमय्या तंत्रनिकेतन महाविद्यालय, मुंबई संघाचा पराभव करीत विजेता ठरला. या सामन्यात दोन्ही संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये कुसरो वाडिया तंत्रनिकेतन महाविद्यालय, पुणे संघाने अंतिम फेरीत नेत्रदीपक खेळ करत 29 _ 21 गुणांनी विजय मिळवला, तर मालेगाव तंत्रनिकेतन महाविद्यालय संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभास किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार श्रीमती आशाताई रंधे, आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश पवार, डॉ दिनेश भक्कड , तसेच क्रीडा संचालक डॉ. एल. के. प्रताळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेश पवार यांनी त्यांच्या मनोगतात खेळामध्ये संयम ,चिकाटी आणि संघभावना शिकण्याची उत्तम संधी मिळते असे व्यक्त केले .तसेच पारितोषिक वाटप समारंभात विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतात महाविद्यालयाने पुरविलेल्या सोय, सुविधानचे कौतुक केले ,
या प्रसंगी विजयी संघांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेने खेळाडूंमध्ये स्पर्धात्मकता आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले. आयोजक महाविद्यालयाने यशस्वीरीत्या स्पर्धा पार पाडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे , सचिव निशांत रंधे , बोराडी उपसरपंच राहुल रंधे , नगरसेवक रोहित रंधे कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे , विश्वस्त शामकांत पाटील , संजय गुजर , यांनी कौतुक केले. तर सूत्र संचालन प्रा हर्षल मिस्त्री यांनी केले तर आभार प्रा सतीश पाटील यांनी मानले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले…