March 3, 2025 7:20 pm

श्रीनगर येथे संत गाडगेबाबा उद्यानात 149 जयंती निमित्त अभिवादन…

अपनी भाषा में पढ़े! Translate

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ..!

श्रीनगर येथे संत गाडगेबाबा उद्यानात 149 जयंती निमित्त अभिवादन…

शिरपूर : शहरातील श्रीनगर मध्ये संत गाडगेबाबा उद्यानात अखिल भारतीय धोबी महासंघ तर्फे संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथजी बोरसे, धुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अध्यक्ष किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर डॉ. तुषारजी रंधे, मा.महिला मंडळ प्रदेशाध्यक्षा आशाताई रंधे, महिला मंडळ प्रदेशाध्यक्षा सीमाताई रंधे, किसान विद्या प्रसारक संस्था सचिव निशांतजी रंधे,परीट धोबी सेवा मंडळ उपाध्यक्ष अरुणजी धोबी, मा. नगरसेवक रोहितजी रंधे,अशोकदादा बेडीस्कर,प्रा. सदाशिवराव ठाकरे, तालुकाध्यक्ष भास्करराव बोरसे, शहराध्यक्ष नरेश पवार आदी उपस्थित होते.

एकनाथजी बोरसे म्हणाले स्वच्छता संत, निष्काम कर्मयोगी, लोक शिक्षणाचे एकविसाव्या शतकाचे चालते फिरते विद्यापीठ होते. त्यांनी भजन , कीर्तनातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनजागृतीचे विलक्षण कार्य केल्याचे ते म्हणाले.महिला मंडळाच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई रंधे यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजनाने सुरवात करून आपले विचार मांडले. तसेच 9 मार्च रोजी साईबाबाच्या कर्मभूमी शिर्डी येथे महाअधिवेशन ला येण्याचे आव्हान केले.

कार्यक्रमास उपस्थित महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा ताई बेडीस्कर, उपाध्यक्ष दिपाली सूर्यवंशी,प्रा.सारिकाताई रंधे,सविताताईं बेडीस्कर,हर्षाली रंधे,प्रमिलाताई सूर्यवंशी,संगीता सूर्यवंशी,ज्योती वाघ,कल्पना येशी,अलका येशी,पूजा लुंगसे. तसेच धोबी सेवा मंडळ युवक जिल्हा उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी,योगेश सैंदाने, महेंद्र येशी , सेवा मंडळाचे लॉन्ड्री धारक जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोरसे,माजी तालुकाध्यक्ष उमेश खैरनार, माजी शहराध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी, भगवानजी वाघ, माजी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर येशी,शहर उपाध्यक्ष अविनाश पवार,राजेंद्र येशी, सुनील धोबी, ईश्वर येशी, अनिल बोरसे,मयूर येशी, रविकिरण भिलाने, सोनू हरडे, संभाजी बोरसे,विजय जाधव,दिलीप येशी, संजय येशी,कुणाल जाधव आदी समाज बंधू भगिनी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!