करमाळा :- करमाळा शहरातील किल्ला विभाग येथील कै.गोविंद निवृत्ती शेळके, वय -65 यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले आहे. कै. गोविंद शेळके हे लोकमान्य टिळक तरूण मंडळ किल्ला विभाग येथील धडाडीचे कार्यकर्ते होते तसेच सन १९८६ साली शिवसेनेचे पहिले शाखा प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले असल्याने कट्टर शिवसैनिक म्हणूनही त्यांची ओळख होती. पुणे रोड येथील टाऊन हॉल शॉपींग सेंटर येथे त्यांचा अंदाजे सन 1975 ते 2000 पर्यंत गोविंदा टी हाऊस हा चहा व भजी चा व्यवसाय होता. त्यांच्या हॉटेलचा चहा व भजी घेण्यासाठी नागरिक त्या ठिकाणी गर्दी करीत असे आजही त्यांच्या चहा व भजीची लोकांना आठवण येत असते. शेळके हे अत्यंत मनमिळावू व जनमानसातील व्यक्तीमत्व असल्याने त्यांचे शहरातील सर्वच स्तरात चांगला जनसपंर्क होता. त्यांच्या जाण्याने लोकमान्य टिळक तरूण मंडळ व करमाळा शहरातील अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून त्यांची अंत्ययात्रा किल्ला विभाग येथून सायं. 07.00 च्या सुमारास निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.