चैतन्य हॉस्पिटल व प्रसुती गृह आयोजित कष्टकरी दुर्लक्षित महिला आरोग्य शिबीर.
(निलेश गायकवाड)
टीचभर पोटाचा खळगा भरण्यासाठी उन्हातान्हात व रात्रंदिवस काबाडकष्ट करणारे ऊसतोडणी कामगार..स्वत: च्या आरोग्याकडे कधी पाहणार?
म्हणून येत्या महिला दिनाचे निमित्ताने ऊसतोड करणाऱ्या
महिलांची हिमोग्लोबिन (रक्ताचे प्रमाण) व आरोग्य तपासणी त्यांच्या पालावर जाऊन चैतन्य हॉस्पिटल तर्फे करण्यात आली.३५ ते ४० महिलांना लोहाच्या व व्हिटॅमिनच्या गोळ्या, नारळपाणी देण्यात आले. ब्लाऊज पिसेस, साडया व कपडेही देण्यात आले.
याचे नियोजन करण्यास सामाजिक कार्यकर्ते श्री योगेश धोरात, नायगाव यांनी अतिशय सहकार्य केले. तसेच श्री स्वप्नील खंडागळे यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले.
आमचे लॅब टेक्निशियन किरण पाटील, सौ मेघासिस्टर शेलार, सहकारी योगेश सूर्यवंशी जातीने कार्यरत होते. अनेक महिलांचे Hb कमी असल्याने व अती गरीब असल्याने ऊसतोडणी कामगारांना आम्ही नेहमीच आरोग्यविषयक सहकार्य,मार्गदर्शन करत असतो.आणि यापुढील काळातही हेच धोरण नेहमीच असेल. रक्तक्षय आणि वैयक्तिक आरोग्य याविषयी ही मोलाचे मार्गदर्शन यावेळी डॉ जयश्री गांधी यांनी केले. महिलांना आणि चिमुकल्या मुलांना यावेळी खाऊवाटप,आणि फुल नाही पण फुलाची पाकळी या नात्याने अंगभर वस्त्र म्हणून एक आरोग्य आई कडून साडी वाटप करण्यात आले..सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा हा उपक्रम नेहमीच आपण यापुढेही जपणार आहोत असे प्रतिपादन डॉ सौ जयश्री गांधी यांनी यावेळी केले.