June 29, 2025 7:43 am

अमळनेरचा समाधान अहिरे युट्युबवर मचवतोय धडाका; 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरचा समाधान अहिरे युट्युबवर मचवतोय धडाका; 

 

जिद्दीने मिळवले १ लाख सब्सक्रायबर्स !

YouTube वर सिल्व्हर प्ले बटण मिळण्यासाठी, तुमच्या चॅनलवर 1 लाख सबस्क्राइबर असावेत लागतात. YouTube क्रिएटर्सच्या मेहनतीचे सन्मान करण्यासाठी, YouTube प्ले बटण दिले जाते.

YouTube वर प्ले बटणांचे प्रकार: सिल्व्हर प्ले बटण, गोल्ड प्ले बटण, डायमंड प्ले बटण.

अमळनेर : विक्की जाधव.

समाधान अहिरे,रा. धानोरा ता. अमळनेर येथील एक प्रतिभाशाली युवक आहे, याचं युट्युब प्लॅटफार्मवर १ लाख सब्सक्रायबर्स पूर्ण झाल्यामुळे त्याला सिल्वर बटण मिळालं आहे. समाधान आता गोल्डन बटण मिळवण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहे.

त्याचे ‘कसी लागनी तुनी मेहंदी’ हे गाणं युट्युबवर प्रचंड धडाका मचवत असून, हे गाणं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं आहे. या गाण्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत आणि त्याला विविध श्रेणींमधून प्रशंसा देखील प्राप्त झाली आहे.

समाधान अहिरे हा युवक आदिवासी कुटुंबातील असून, तो एक सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्यांच्या साध्या आयुष्यातून आलेली ही गाथा निश्चितच प्रेरणादायक आहे. 

 

समाधानच्या यशाने असे स्पष्ट होतं की, मेहनत, प्रतिभा आणि योग्य व साधेपणा यांचं संगम केल्यास कोणत्याही व्यासपीठावर यश मिळवता येतं. त्यांच्या पुढील प्रोजेक्ट्स आणि गाण्यांबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. याप्रकारे, समाधान अहिरेने आत्मविश्वास आणि संकल्पनेच्या माध्यमातून युवा पिढीसाठी प्रेरणा देणाऱ्या यशाची कहाणी वाचनार्‍यांसमोर ठेवली आहे.

आगामी काळात, समाधान ला गाण्यांच्या क्षेत्रात आणखी उच्च शिखर गाठण्याची अपेक्षा आहे, आणि यासाठी त्यांचे यश अभिवृद्धी करण्यासाठी त्यांना शुभेच्छा!

मार्मिक समाचार. राज डिजिटल परिवार 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!