सुरंगली येथील माजी सरपंच एकनाथ राव टोंपे यांचे निधन ।
भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील सुरंगलीकर । भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथील माजी सरपंच तथा स्वस्त धान्य दुकानदार एकनाथ राव साळुबा टोंपे जेष्ठ भाजपा नेते यांचे काल दिनांक 9 फेब्रुवारी रविवारी सायंकाळी 7 ते7.15 वाजेच्या दरम्यान दुःखद निधन झाले मृत्यू समयी ते 76 वर्षा चे होते . त्यांच्या पश्चात तीनं मुले एक मुलगी पत्नी , तिनसुना ,नातु पंतु असा परीवार आहे. त्यांच्या वर आज सुरंगली येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत विधिस सर्व स्तरातील मंडळी हजर होती. महाराष्ट्र पोलीस जिल्हा ठाणे शहर पोलिस दलात कार्यरत असलेले नामदेव टोंपे यांचे ते वडील होते.
सुरंगली येथील प्रसिद्ध श्री काशी विश्वेश्वर तिर्थक्षेत्र सुरंगली मंदिर समितीचे विश्वस्त होते.