February 20, 2025 4:46 pm
न्यूज
ब्रेकिंग

गाव हेच देऊळ आहे आणि त्या देऊळlतील देव म्हणजेच त्या गावातील लोक असे सांगून त्यांनी जनसेवेचे तत्व लोकांचा मनात भजनाने रुजवन्याचे प्रयत्न व.राष्ट्रसंत श्री तूकडोजी महाराजानी केले :-विशाल दा. निंबाळकर..

मामा मंत्री झालेत आता भिगवण चे बसस्थानक बारामती सारखे जरी नाही झाले तरी डागडुजी नक्की होईल ना..?

अमळनेर करांची मानाची सार्वजनिक शिवजयंती भव्य मिरवणूक व युवकांचे रक्तदान शिबिराच्या उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी झाली.

तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन जागृत देवस्थान श्री क्षेत्र ममलेश्वर महादेव मंदिर संस्थान झाडी येथे महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सव. 

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी..

मुंजोबाच्या यात्रेतून महिलेची ११ महिलांच्या गळ्यातील सोनपोत लंपास !

अपनी भाषा में पढ़े! Translate

 

मुंजोबाच्या यात्रेतून महिलेची ११ महिलांच्या गळ्यातील सोनपोत लंपास !
यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ११ महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत चोरी केल्या. गर्दीतून नागरिकांनी काही संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, त्यांच्याकडून पोलिसांना काहीच मिळून आले नाही. तर याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अट्रावल, ता. यावल येथे प्रसिद्ध मुंजोबा यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये सपना भरत कोळी (रा. गोरगावले, ता. चोपडा) यांच्यासह विविध महिला आल्या होत्या. तर कोळी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरी केली.
साडेसात हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरी झाल्याचे समोर आले. दरम्यान, याच यात्रेत रत्ना रवींद्र कुंभार (रा. नायगाव, ता. यावल), दीपाली सतीश पाटील (रा. थोरगव्हाण, ता. यावल), पूनम नंदू धनगर (रा. धरणगाव), छाया रवींद्र हिरे (रा. महाबळ कॉलनी, जळगाव), मनीषा संजय हिरे (रा. भुसावळ), दीपाली ज्ञानेश्वर बाविस्कर (रा. कुसुंबा, ता. जळगाव), अन्नपूर्णा वसंत सुरवाडे (रा. भुसावळ), भावना प्रवीण तायडे (रा. निमगाव, ता. यावल) व ज्योती हेमंत महाजन (रा. पारोळा) या ११ महिलांच्या गळ्यातून सोन्याच्या पोत चोरी झाल्या आहेत. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाराजी नाघमोरे करीत आहेत.

वाहनाची दुचाकीला धडक : तरुण ठार
मित्राची बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी जळगावला येत असताना वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे मोहित संजय मोरे (२०, रा. उमाळा ता. जळगाव) हा तरुण ठार झाला. तर इयत्ता बारावीचा विद्यार्थी गौरव अशोक पाटील (१८, रा.उमाळा) जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुपारी १ वाजेच्या सुमारास आर.एल. चौफुलीपासून पुढे आल्यानंतर मागून येणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहितचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मोहीत हा फार्मसीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.

दोन दुचाकीस्वारांचा थरार : ९ लाखांची पिशवी पळविली !
अमळनेर : प्रतिनिधी
बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी एकाचे ९ लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, भोईवाडा येथील रहिवासी बापू शिंगाणे हे पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांची पत्नी सुरेखा यांच्यासह ते बँकेत गेले होते. बँकेतून ९ लाख रुपये काढल्यानंतर त्यांनी ते पिशवीत नीट गुंडाळून पिशवी दुचाकीला टांगली आणि पिशवी स्वतःकडे ठेवून घराकडे आले. घराजवळ दुचाकी थांबवली असता, काळ्या दुचाकीवरून दोघेजण आले आणि त्यांनी पैशांची पिशवी हिसकावून कसाली डीपीकडे पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
या घटनेचे वृत्त कळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी भाऊसाहेब घोलप, पोलिस निरीक्षक विकास देवरे, पोउनि. नामदेव बोरकर, मंगल भोई, विनोद संदनशिव, अमोल पाटील, नितीन कापडणे, रवींद्र पाटील, पूनम हटकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली…
दरम्यान, या चोरट्यांचे फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असून त्यावरून हे चोरटे महाराष्ट्रीय नसून आंध्रप्रदेश येथील असल्याचा कयास पोलिसांनी काढला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास पथके तयार केली आहेत. बापू शिंगाणे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विकास देवरे करत आहेत.

 

 

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरातील रेमंड चौफुली जवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण हा गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान इयत्ता बारावीच्या मंगळवारपासून परीक्षा असून त्याकरिता बैठक व्यवस्था पाहण्यासाठी दोघे तरुण जळगावात येत होते, अशी माहिती मिळाली. घटनेप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मोहित संजय मोरे (वय २०, रा. उमाळा ता. जळगाव) असे तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, बहिण यांच्यासह राहत होता. फार्मसीच्या प्रथम वर्षांत शिक्षण घेत होता. दरम्यान उमाळा गावातील गौरव अशोक पाटील (वय १८) याची मंगळवारपासून बारावीची परीक्षा असल्यामुळे जळगावात बैठक व्यवस्था पाहण्यासाठी गौरव सोबत मोहित मोरे हा जळगाव येथे येत होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉटेल जवळ आले असताना मागून भरधाव वाहनाने धडक दिली.
या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर जोरात पडले. त्यात दोघं गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास मोहित मोरे याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पुढील कार्यवाहीसाठी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अपघाताची मालिका जळगाव शहरात दिसून येत आहे.
जळगावात चोरट्यांनी बंद घर फोडून ३४ हजारांचा मुद्देमाल लांबवला
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवम नगर येथे घरफोडीची घटना समोर आली असून अज्ञात चोरट्याने घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रविवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शिवम नगर येथे राहणारे स्वप्निल विश्वनाथ गवळी (वय ३२) हे कुटुंबासह वास्तव्याला असून खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. ७ फेब्रुवारीच्या – सकाळी ७ वाजता घर बंद करून ते बाहेर गेले होते. त्यानंतर ८ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपर्यंत घर बंद होते. या दरम्यान, अज्ञात चोरट्याने संधी साधत घराच्या
कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील दोन्ही लोखंडी कपाट फोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. गवळी कुटुंब घरी परतल्यावर घरफोडीची घटना उघडकीस आली. यानंतर त्यांनी तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या तक्रारीच्या आधारे रविवार दि.९ फेब्रुवारी दुपारी १२.३० वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल गुलाब माळी करत आहेत.

मुंजोबाच्या यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ !
जळगाव- | ११ फेब्रुवारी २०२५
यावल तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्‌यांनी तब्बल ११ महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरुन नेल्यात. दरम्यान, गर्दीतून नागरिकांनी काहि संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, त्यांच्याकडून पोलिसांना काहिच मिळाले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात्रेत गर्दीचा फायदा घेत काहि महिलाच चोरी करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अट्रावल येथील प्रसिद्ध असलेल्या मुंजोबाची यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील सपना भरत कोळी यांच्यासह विविध महिला आल्या होत्या. तर कोळी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. साडेसात हजारांची सोन्याची पोत चोरी झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याच यात्रेत यावल तालुक्यातील नायगाव येथील रत्ना रवींद्र कुंभार, थोरगव्हाण येथील दीपाली सतीश पाटील, धरणगाव येथील पूनम नंदू धनगर, जळगावच्या महाबळ कॉलनीतील छाया रवींद्र हिरे, भुसावळ येथील मनीषा संजय हिरे, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील दीपाली ज्ञानेश्वर बाविस्कर, भुसावळ येथील अन्नपूर्णा वसंत सुरवाडे, यावल तालुक्यातील निमगाव येथील भावना प्रवीण तायडे व पारोळा येथील ज्योती हेमंत महाजन अशा या ११ महिलांच्या गळ्यातून सोन्याच्या पोत चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी काही संशयित महिलांना व मुलींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, चौकशी अंति त्यांच्याकडून काहिच आढळून आले नाही.

दोन दुचाकीस्वारांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे ९ लाख लांबविले !
जळगाव – ११ फेब्रुवारी २०२५
अमळनेर शहरात बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी एकाचे ९ लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना १० रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भोईवाडा येथील रहिवासी बापू शिंगाणे हे नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांची पत्नी सुरेखा शिंगाणे यांच्यासह ते आयडीबीआय बँकेत गेले होते. बँकेतून ९ लाख रुपये काढल्यानंतर त्यांनी ते पिशवीत नीट गुंडाळून पिशवी दुचाकीला टांगली. तसेच ती पिशवी मांडीवर ठेवून ते घराकडे निघाले. घराजवळ दुचाकी थांबवली असता काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन व्यक्ती आले आणि त्यांनी पैशांची पिशवी हिसकावून कसाली डीपी कडे पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी भाऊसाहेब घोलप, पोलीस निरीक्षक विकास देवरे, पीएसआय नामदेव बोरकर, मंगल भोई, विनोद संदानशिव, अमोल पाटील, नितीन कापडणे, रवींद्र पाटील, पूनम हटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी बापू शिंगाणे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करत आहेत.

दुचाकीला कट लागल्याने रिक्षाचालकाला मारहाण
जळगाव : प्रतिनिधी
नशिराबाद गावातील मेन रोडवर रिक्षाचा दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाला हातातील कड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ९ फेब्रवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी अडीच वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शेख शोएब शेख जहीर (वय २७) रा. इस्लामपूरा, नशिराबाद हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील मेन रोडवरून शेख शोएब हा रिक्षा घेवून जात असतांना त्यांच्या वाहनाचा दुचाकीला कट लागला. या कारणावरून पवन नावाच्या दुचाकीस्वाराने रिक्षा चालक शेख शोएब याला शिवीगाळ करत हातातील कळ्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी रिक्षा चालक शेख शोएब शेख जहीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी अडीच वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे

जळगावातून १७ वर्षीय मुलीला पळविले !
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील खान्देश मिल कॉलनीतील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीचे फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिला काहीतरी आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!