प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचा अभ्यास दौरा संपन्न..
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा शैक्षणिक सहलीचा आयोजन करण्यात आले. ही शैक्षणिक सहल दि. 05 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये पदवी ते पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी लळिंग किल्ला, लांडोर बंगला, इतिहास बार वि.का.राजवाडे संशोधन केंद्र, धुळे, व का.स.वाणी प्रगत अध्ययन संस्था, धुळे या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले. एकूण 24 विद्यार्थ्यांनी या सहलीत भाग घेतला.
या सहलीचा मुख्य उद्देश मराठी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांचा परिचय करून देणे आणि त्यांचा अभ्यास विषयावर प्रभावी ठसा निर्माण करणे होता. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभ्यास आणि संवर्धन करणारी का.स.वाणी प्रगत अध्ययन संस्थेची माहिती देखील यानिमित्ताने समजावून सांगण्यात आली. सहलीचे यशस्वी नियोजन प्रा. योगेश पाटील (समन्वयक) आणि प्रा. प्रतिभा पाटील (सह-समन्वयक) यांच्यासह, विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. रमेश माने, डॉ. विलास गावीत आणि प्रा. किरण पाटील यांनी केले. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात एक महत्वपूर्ण अनुभव मिळाला, ज्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील ज्ञान वर्धन झाले आणि ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व कळले.