राहूल सोलापुरकरच्या तोंडाला भटशाहीच्या हागणदारीचा वास येतोय !
दत्तकुमार खंडागळे
द्वेषाची विष्ठा खाऊन महापुरूषांच्या नावाने पिचका-या मारायची संघी परंपरा सनातन आहे. राहूल सोलापुरकर सारखी अनेक बांडगुळं विकृत पिचका-या मारत आलेली आहेत. ते अशी हिम्मत करतात याचा अर्थ ते मुर्ख, बावळट किंवा येडचाप नव्हेत. त्यांना हे करायचच असतं. त्यांना बहूजन समाजातल्या महापुरूषांना बदनाम करत संपवायचं असतं. त्यासाठी ते अधून मधून खडे मारत असतात. ज्या ज्या महापुरूषांनी ब्राम्हण्यशाहीवर हातोडा चालवला त्या त्या महापुरूषांना त्यांच्या हयातीत खुप छळले. काहींच्या हत्या केल्या. हत्या करूनही जे संपले नाहीत त्यांना बदनामीच्या अस्त्राने मारण्याची परंपरा निर्माण केली. त्याच कुटील कारस्थानाचा वास राहूल सोलापुरकरच्या नालायकीला येतो आहे.
अनेक चरित्रांना बदनाम करण्यासाठी ही पिलावळ कार्यरत असते. वेळोवेळी बदनामीची लिटमस टेस्ट सुरू असते. आजवर छत्रपती शिवाजी राजे, संभाजी राजे, महात्मा फुले, महात्मा गांधी, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा प्रत्येक महापुरूषांच्यावर बदनामीच्या पिचका-या मारल्या गेल्या आहेत. तरी पण एकही महापुरूष त्यांना संपवता आलेला नाही. त्याचे विचार, त्यांचे कार्य संपलेले नाही. तो बोथट झालेला नाही. या बदनामीच्या कारस्थानातून या महापुरूषांची चरित्र पुन्हा उजळून उठली आहेत. नव्या तेजाने तळपली आहेत. ही माकडं सुर्यावर थूंकायचा प्रयत्न करतात पण ती थूंकी त्यांच्याच तोंडावर पडते. अभिनेता राहूल सोलपुरकरने छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर पिचकारी मारण्याचा असाच हलकट व कुटील प्रयत्न केला आहे. तो असं सहज नाही बोलू शकत. त्याच्या कुटील टकल्यात जात वर्चस्वाची खुमखुमी, बदल्याची भावना आणि स्वत:च्या शुद्रत्वाचा न्युनगंड दडला आहे. त्याच भावनेने तो बोलून गेला आहे. कारस्थानं करायची आणि पचली तर पचवायची. नाही पचली तर माफी मागून मोकळं व्हायचं. हिच या भडव्यांची स्टॅटेजी आहे. ही भ्याड पिलावळ आजवर हाच खेळ खेळत आली आहे. जिजाऊ मातेच्या चरित्रावर अशीच गरळ ओकली गेली. ‘जेम्स लेन’ च्या माध्यमातून या नालायकांनी स्वत:च्या मस्तकातलं विष समाजात पसरवायचा प्रयत्न केला. ज्या विकृतांनी जेम्स लेनच्या माध्यमातून जिजामातेची बदनामी करण्याचा प्रयत्न चालवला होता त्याच सांप्रदायातला राहूल सोलापुरकर आहे. त्याची उठबस त्याच पिलावळीतली आहे. त्यामुळे तो वेगळं काही बोलला असता तर नवल वाटलं असतं. तो आजवर कुणा-कुणाच्या पायाशी बसला आहे ? कुणा-कुणाच्या ताटाला ताट लावून जेवला आहे ? याचा इतिहास बघता हा टकला वेगळं काय बोलणार ? हा खरा प्रश्न आहे.
हे सर्व जाणिवपुर्वक सुरू आहे. साळसुदपणाचा आव आणत एकदम संयमाने, सभ्यतेने शिवरायांच्या चरित्रावर हल्ले सुरू आहेत. सुरूवातीला कुजबुज करायची, हळू आवाजात बोलायचं, जनमाणसात पुड्या सोडायच्या, त्यांच्या कानावर ते जाऊ द्यायचं. असं करताना प्रतिकार नाही झाला, कुणाला राग येत नाही, लोक शांत आहेत, खवळून उठत नाहीत, विष पचतय असं दिसलं की ते चर्चेला घ्यायचं. परत त्यावर सभा-संमेलनात बोलायच. हळूच एखादं पुस्तक छापायचं. त्याच्या प्रती गपचुप आणि स्वस्तात घरोघर पोहोचवायच्या (जसे पुरंदरेचं कारस्थानी पुस्तक घराघरात पोहोचवले तसे). आपल्या डोक्यातलं विष समाजाच्या नसानसात रूजवायचं. आजवर या जातीयवादी प्रवृत्ती हेच करत आल्यात. ‘जेम्स लेन’ प्रकरणात या हरामखोरांनी हेच केलं. शिवरायांचा जयघोष करून झाला, त्यांचा दंगलीसाठी व सत्तेच्या राजकारणासाठी वापर करून झाला. आता त्यांच्या चरित्रावर हल्ले चालू केेलेत. हे खोटं, ते खोटं, हे रचलेलं, ते सुचलेलं असं म्हणत म्हणत शिवचरित्राचे लचके तोडण्याचे कारस्थान शिजले असावे की काय ? असा संशय येवू लागला आहे. हा राहूल सोलापुरकर नावाचा भामटा इतिहास संशोधक कधी झाला ? याने कधी इतिहासाच संशोधन केलं ? ज्याने हयातीत कधी पोवाडा म्हंटला नाही तो शिवशाहीर होतो आणि जिजाऊंच्या बदनामीची सुपारी घेतो. जो टकला हयातभर लाली पावडर लावून पोट भरत आला तो आता इतिहास संशोधक होवून शिवरायांच्या चरित्रावर पचतील असे हल्ले चढवू लागला आहे. लोकांच्या गळी उतरेपर्यंत ‘हिंदू हिंदू’ असे नारे दिले. हिंदूत्वाच्या आडून आपलं ‘ब्राम्हण्य’ बहूजनांच्या गळी उतरल्याची खात्री होताच त्याला हे आता ‘सनातन धर्म’ म्हणू लागले आहेत. बहूजनांची कशी थुंकी लावून विणातक्रार मारली जाते याचे हे उत्तम उदाहरण. खंत आणि शरम याच गोष्टीची वाटते की बहूजन समाज या सगळ्या षढयंत्रांना बळी कसा पडतो ? या लोकांच्या बदमाषीला कसा भुलतो ? शिवरायांचा अपमान इतर कुणी केला की या लोकांच्या दावणीला असलेले तथाकथित धर्माभिमानी, शिवप्रेमी चवथाळून उठतात आणि याच संघी गोतावळ्यातील कुणी तो अपमान केला की तथाकथीत शिवभक्तांच्या व धर्माभिमान्यांच्या तोंडातून ‘ब्र शब्द’ सुध्दा बाहेर पडत नाही. हा समाज नंदीबैलासारखा कसा काय वागू शकतो ?
स्वातंत्र्यापासून आजपर्यंत बिळात लपलेले हे सगळे साप आता हळूहळू बाहेर येत आहेत. बहूजन समाजाच्या इतिहासाला, इतिहास पुरूषांना दंश करत आहेत. केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेने या लोकांना भलताच माज आलाय. ते सुसाट सुटले आहेत. सगळीच सत्ताकेंद्रं काबीज केल्याने ते बेभान झालेत. सत्तेच्या खुमखुमीने हे लोक मस्तावले आहेत. आमचं कुणीच काय वाकड करू शकत नाही या भ्रमात ते आहेत. त्यामुळे कुणावरही आपल्या विकृत विचारांची पिचकारी टाकत आहेत. आम्हीच सुप्रीम आहोत, आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत. आम्ही परशूरामाचे अवतार आहोत. बाकी सगळे जीव शुद्र अशा मानसिकतेपोटी ते कुटील कारस्थानं करत आहेत. पण एक दिवस हाच कुटीलपणा त्यांना अडचणीचा ठरल्याशिवाय राहणार नाही.
राहूल सोलापुरकरच्या माध्यमातून बदनामीचेच अस्त्र पुन्हा परजलय. आजवर शिवरायांचे मोठेपण आपल्याच जातीवर घ्यायला जातीने प्रयत्न केले पण ते जमलं नाही. कितीही धडपड केली तरी ते उघडं पडलंच. शिवरायांच्या कर्तृत्वाचे मोठेपण आपल्या जातीकडे घेण्यासाठी त्यांना नसलेले गुरू चिटकवले. कुणी कोंडदेव, कुणी स्वामी चिटकवले. त्यासाठी कसलाही संदर्भ नसलेल्या कथा जन्माला घातल्या. त्या पसरवल्या पण यश आले नाही. बहूजन समाजातील स्वत:च्या धडावर स्वत:चेच डोकं असणा-या पोरांनी ही हरामखोरी खणून काढली. इतिहासाच्या प्रांगणात यांच्या लबाडीचे गाडलेले मुडदे उकरून काढले. त्यांना त्यांची औकाद दाखवून दिली. गुरू परंपरा सांगून आमच्यामुळेच ते मोठे होते हे सांगण शक्य झालं नाही म्हणून ते मोठे नव्हतेच असं सिध्द करण्याचा खटाटोप चालवला आहे की काय ?असा संशय आता येवू लागला आहे. राहूल सोलापुरकरच्या तोंडाला भटशाहीच्या हागणदारीचा वास येवू लागला आहे. तेव्हा सावध महाराष्ट्रा सावध. जपून चाल पुढे धोका आहे.
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, 9561551006