June 28, 2025 5:30 pm

शिरपूर येथे उद्या मोफत नेत्र तपासणी शिबिर

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर येथे उद्या मोफत नेत्र तपासणी शिबिर

महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेचा उपक्रम

शिरपूर प्रतिनिधी : येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थे तर्फे राजपूत समाजातील नागरिकांसाठी गुरवार दि ६ फेब्रुवारीला सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिर होणार आहे. मोतीबिंदू व डोळ्यां संबंधित सर्व आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे. सदरहू शिबिर शहरातील स्व. इंद्रसिंग भाऊसाहेब मेमोरियल हॉल (राजपूत भवन, वरझडी रोड) येथे होणार आहे.

या शिबिराचे प्रायोजक सुरत येथील प्रसिद्ध कपडा उद्योजक श्री रविंद्रसिंग भटेसिंग राजपूत (रविशेठ देऊर शहादा) आहेत. नेत्रतज्ञ डॉ. दीपक जाधव, डॉ. शीतल जाधव तपासणी करतील. या उपक्रमाला गुजरातमधील आणंद येथील शंकरा आय हॉस्पिटलचे सहकार्य लाभणार आहे.

तालुक्यातील समाज बंधू भगिनींनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था शिरपूरचे अध्यक्ष संग्रामसिंग सरदारसिंग राजपूत, संस्थेचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया, व्यवस्थापक प्रविणसिंग राजपूत व विश्वस्त मंडळाने केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!