June 29, 2025 5:12 pm

खा. वाघ यांच्या प्रयत्नाने अमळनेरकरांना महाकुंभाचे दर्शन; कुंभमेळा विशेष गाडीला अमळनेर येथे थांबा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

खा. वाघ यांच्या प्रयत्नाने अमळनेरकरांना महाकुंभाचे दर्शन; कुंभमेळा विशेष गाडीला अमळनेर येथे थांबा..

 

अमळनेर: विक्की जाधव.

प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्पेशल रेल्वे गाडी बलसाड ते प्रयागराज या मार्गावर चालवण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे, या गाडीस अमळनेर स्थानकावर थांबा मिळाल्यामुळे आपल्या कडील भाविकांची सोय झाल्याची माहिती खा. स्मिता उदय वाघ यांनी दिली.

 

 

 

 

 

राज डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडीओ आमच्या कडे लग्न समारंभ साखरपुडा आणि इतर शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारला जातात.

गाडीला अमळनेर स्थानकावर थांबा मिळवण्यासाठी खासदार वाघ यांनी विशेष प्रयत्न केले. पश्चिम रेल्वे चे महाव्यवस्थापक दिलीप कुमार झा यांनी या गाडीच्या थांब्यास मंजुरीचे पत्र दिले आहे.

अशी असणार गाडीची वेळ :

– गाडी क्रमांक 09019 : बलसाड येथून प्रयाग जाण्यासाठी हि गाडी 25 जानेवारी, 8 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, आणि 26 फेब्रुवारी रोजी धावणार आहे.

– आगमन: 1:10 वाजता

– रवाना: 1:12 वाजता

– गाडी क्रमांक 09020 : प्रयाग येथून बलसाडकडे येण्यास ही गाडी 26 जानेवारी, 9 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, आणि 27 फेब्रुवारी रोजी धावणार आहे.

– आगमन: 4:30 वाजता

– रवाना: 4:32 वाजता

या विशेष गाडीच्या माध्यमातून कुंभमेळ्यावर जाणाऱ्या अमळनेरकरांना मोठा फायदा होणार आहे. खा. स्मिता वाघ यांनी सर्व भाविकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

अमळनेरकरांकरिता हीं एक सुवर्णसंधी असून, त्यांचा कुंभमेळा अनुभवण्याचा संकल्प साकार होणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!