अजितदादा पवार यांचा ताफा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भिगवण येथे होणाऱ्या उदघाटन प्रसंगी;विश्वजीत रेस्टॉरंट समारंभ
(निलेश गायकवाड)
मदनवाडी येथील विश्वजित रेस्टॉरंट अँड लॉजिंग या रविवारी होणाऱ्या 26 जानेवारी उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पहिल्यांदाच यांच्या उपस्थित समारंभ पार पडणार असल्याचे मदनवाडी ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच सौ.अश्विनी नानासाहेब बंडगर यांनी बोलताना सांगितले.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा दौरा राजकीय दृष्टीने महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच भिगवण शेटफळ गडे गटातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी अजितदादा पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे यांचा हा समारंभ उदघाटन दौरा महत्वाचा असणार आहे.