June 29, 2025 8:02 am

गुरुकृपा कॉलनी रहिवासीनी केली नगर परिषदेकडे रस्ते व गटार दुरुस्तीची मागणी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

गुरुकृपा कॉलनी रहिवासीनी केली नगर परिषदेकडे रस्ते व गटार दुरुस्तीची मागणी..

 

अमळनेर : विक्की जाधव 

धुळे रोडवरील कॉटन मार्केटच्या मागे असलेल्या गुरुकृपा कॉलनीचे रहिवासीनी नगर परिषदेकडे रस्ते व गटार दुरुस्तीची मागणी केली आहे. याबाबत नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की सन १९९९ पासून अस्तित्वात असलेली ही कॉलनी आजपर्यंत विकासापासून वंचित राहिली आहे. विशेषतः भालेराव नगरला लागून असलेल्या तीनही गल्ल्यांमध्ये चांगले रस्ते नाहीत. गटारी जीर्ण झालेल्या आहेत, ठिकठिकाणी तुटलेल्या आहेत. यामुळे पाण्यात राहणारे सापांचाही उपद्रव वाढला आहे. परिणामी, कॉलनीतील नागरिक भयभीत झाले आहेत.त्यामुळे ग्रामस्थांनी नगर प्रशासनाकडे रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याची आणि गटारी दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. जर त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर नगर परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचेही म्हटले आहे,

या निवेदनावर हरीचंद्र कढरे, वसंत काटे,राजू कांबळे,सुदाम बाविस्कर, सचिन संदानशिव, विशाल सोनवणे, मानस ठाकरे,सुरेश संसारे,निंबा मैराळे आदी च्या सह्या आहेत

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!