“सिडको जमीन भूखंड घोटाळा प्रकरणी कुबेर लँड डेव्हलपर्स यांची याचिका खंडपीठाने फेटाळून लावली”
मार्मिक समाचार : विक्की जाधव.
“दिवाणी न्यायालयाने कोर्ट स्टॅम्प कमी जोडलेला आहे म्हणून भरण्याचा आदेश दिला आणि त्यानंतरही वादीने ती रक्कम भरली नाही तरच ऑर्डर सात रुल 11 नुसार दवा फेटाळता येऊ शकतो”
याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री कैलास पुंगळे यांनी कुबेर लँड डेव्हलपर्स व भागीदार यांच्याकडून 1987 साली सिडको महानगर येथे प्लॉट खरेदी केलेला होता. परंतु टाऊन प्लॅनिंग ऑफिसर यांनी सदरील जागेचे अधिग्रहण केल्यामुळे सदरील प्लॉट धारकांना नवीन प्लॉट देण्यात येतील असे हमीपत्र कुबेर लँड डेव्हलपर्स व भागीदार यांनी सिडको कार्यालयास दिलेले होते. सदरील प्रकरणी डेव्हलपर्स यांनी संपादित क्षेत्राचा मावेजा खोट्या मुखत्यारपत्र च्या आधारे परस्पर उचलला आहे व वादीस कुठलाही मावेजा देण्यात आलेला नाही तसेच त्या बदल्यातील नवीन भूखंड ही देण्यात आलेला नाही. त्यामुळे श्री कैलास पुंगळे यांनी लँड डेव्हलपर्स यांच्या विरुद्ध पोलिसात व न्यायालयात सदरील फसवणुकी प्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे. तसेच कुबेर लँड डेव्हलपर्स यांनी 2018 साली तडजोड पत्र करून सदरील भूखंडाच्या बदल्यात नवीन भूखंड देण्याचे संदर्भात करार केलेला होता परंतु आजपर्यंत नवीन भूखंड देण्यात आलेला नाही करिता त्यांनी दिवाणी न्यायालयात सदरील करार पूर्ण करून मिळावा यासाठी दावा दाखल केलेला आहे. सदरील दाव्यात कुबेर लँड डेव्हलपर्स यांच्यातर्फे दावा वेळेत दाखल नाही व योग्य ती स्टॅम्प फी जोडलेली नाही म्हणून दावा रद्द करण्यात यावा अशी विनंती करण्यात आलेली होती सदर विनंती दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सदर याचिकेच्या सुनावणीस कैलास पुंगळे यांच्यामार्फत एडवोकेट निलेश भागवत यांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेता सदरील करार 2018 साली झालेला असल्यामुळे दावा वेळेत दाखल आहे व सदरील करार हा फक्त एका जागेच्या बदल्यात दुसरी जागा देण्यासाठी झालेला आहे त्यात कुठलेही मोबदल्याचा उल्लेख नाही त्यामुळे , दाव्यासाठी जोडलेली कोर्ट फी ही योग्य आहे तसेच दिवाणी न्यायप्रकरणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 7 रुल 11 नुसार जेव्हा दिवाणी कोर्ट स्टॅम्प कमी जोडलेला आहे म्हणून भरण्याचा आदेश देईल आणि त्यानंतर वादीने ती रक्कम भरली नाही तरच ऑर्डर सात रुल 11 नुसार दवा फेटाळता येऊ शकतो त्यामुळे दिवाणी न्यायालयाने दिलेला योग्य निर्णय आहे, असा असा निर्वाळा देत सदर याचिका माननीय खंडपीठाने फेटाळून लावली आहे
सदरील प्रकरणी कुबेर लँड डेव्हलपर्स यांच्यातर्फे एडवोकेट विर्धे व श्री कैलास पुंगळे यांच्यामार्फत एडवोकेट निलेश भागवत व ऍड विजय पुंगळे यांनी काम पाहिले.