June 29, 2025 8:13 am

स्पर्धा परीक्षेत संकल्पनात्मक स्पष्टता महत्वाचे- विकास गिरासे यांचे प्रतिपादन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्पर्धा परीक्षेत संकल्पनात्मक स्पष्टता महत्वाचे- विकास गिरासे यांचे प्रतिपादन..

 

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत रुसा, करिअर कौन्सिलिंग सेंटर,अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधरा दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्सच्या चौथ्या दिवसाचे मार्गदर्शन युनिक फाउंडेशनचे विकास गिरासे यांनी आज सकाळी 10 ते 12 व दुपारी 1 ते 3 दरम्यान विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील परीक्षेचे विविध टप्पे,स्वरूप व कार्यपद्धती या संदर्भात सूक्ष्मत्वाने मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या व्याख्यानात असे म्हटले की, एमपीएससी परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अकरावीपासून स्पर्धा परीक्षा समजून घेणे महत्त्वाचे आहे.सन 2025 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार त्याची तयारी करणे आज काळानुरूप महत्त्वाचे आहे, या परीक्षेत असणाऱ्या पॅटर्न संबंधी चर्चा करून पेपरमध्ये आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमाची आणि त्यानुसार नियोजन करावे.

या यावेळी विकास गिरासे यांचे स्वागत व सत्कार करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.जितेंद्र पाटील यांनी केले. प्रस्तुत मार्गदर्शन अभ्यास कोर्सचे सूत्रसंचालन गणित विषयाचे सहाय्यक प्रा.रोहन गायकवाड यांनी केले.

यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!