June 29, 2025 2:41 pm

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी

अपनी भाषा में पढ़े! Translate

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी

पुणे ग्रामीण, मुंबई शहर संघाला विजेतेपद

बारामती/वर्षा चव्हाण

पुरुष विभागात मुंबई शहर पूर्व संघाने, तर महिला विभागात पुणे ग्रामीण संघाने छत्रपती शिवाजी महाराज चषक या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या यजमान पदाखाली बारामती येथे ही स्पर्धा पार पडली.

पुरुष विभागातील अंतिम सामन्यात मुंबई शहर पूर्व संघाने पुणे ग्रामीण संघावर ३५-३१ असा विजय मिळवला. मध्यंतराला मुंबई शहर पूर्व संघाकडे १७-९

अशी आघाडी होती. मुंबई शहर पूर्वच्या प्रणय राणे व शार्दुल पाटील यांनी आपल्या जोरदार खेळाच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. संकेत सावंत याने उत्कृष्ट पकडी केल्या.

महिला विभागाच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघाने मुंबई शहर पश्चिम संघावर ३७-२८ असा विजय मिळवला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे २०-१५ अशी आघाडी होती. पुणे ग्रामीणच्या खेळाडूंनी सामन्याच्या सुरुवातील अत्यंत अडखळत सुरुवात केली होती, मात्र थोड्यात वेळात सलोनी गजमल व निकिता पडवळ यांनी आपल्या अत्यंत आक्रमक खेळाने संघाला सावरले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!