June 29, 2025 11:07 am

स्वाभिमानी मराठा महासंघ चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्वाभिमानी मराठा महासंघ चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन संपन्न..

पंढरपूर/वर्षा चव्हाण

स्वाभिमानी मराठा महासंघ चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन 5जानेवारी 2025 रोजी विठुरायाच्या पंढरी नगरीत (पंढरपूर)येथे संपन्न झाले.

स्वाभिमानी मराठा महासंघ अराजकीय भूमिकेतून मराठा, कुर्मी, पटेल समाजाला देशभर एकत्र करत आहे. मराठा आरक्षण, गडकिल्ले संवर्धन, शेतकरी प्रश्न,शिवस्मारक,युवकांचे प्रश्न,रोजगार, शैक्षणिक प्रश्न, वैद्यकीय मदत , महिला सक्षमीकरण व सुरक्षितता अशा वेगवेगळ्या सामाजिक विषयावर विचारविनिमय करण्यात आला.
भारतातील विविध राज्यातील अनेक पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

महिलांचा सहभाग देखील लक्षनीय होता.
संघटनेच्या सर्वं पदाधिकारी यांनी आपल्या संघटनेचे विचार तळागाळा पर्यंत पोहचविण्यासाठी व संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत,असे संस्थापक अध्यक्ष . डॉ कृषीराज टकले पाटील यांच्या वतीने सांगण्यात आले..सर्वच स्तरातील पदाधिकारी, राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा उपाध्यक्ष शिवभक्त जगदीश राऊत प्रदेश अध्यक्ष दिपक दादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष निलेश धुमाळ तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आयोजकांनी चांगले नियोजन केले होते.
अनेक मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले.

देशातील प्रत्येक भागात संघटना काम करत आहेच तरीही सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचून प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी ग्वाही दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!