श्रमदानातून झाडे जगवण्याचा तरुणांचा हेतू…
प्रतिनिधी: अजिनाथ कनिचे
माढा तालक्यातील तांदुळवाडी येथे स्मशानभूमी जवळ लावण्यात आलेली झाडे उन्हाळ्यात पाण्या अभावी जळून जाऊ नये, म्हणून तरुण वर्ग व निसर्गप्रेमी सरसावले आहेत. प्रत्येक झाडांना पाणी मिळावे म्हणून झाडाभोवती अळी तयार करून पाणी सोडण्याचा निर्धार केला आहे.
अनेक तरुणांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत कमीत कमी पाच झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
या कार्यासाठी अनेक तरुणांनी आपापल्या पद्धतीने कार्यास हातभार लावण्याचा निर्धार केला आहे.
यावेळी तुकाराम गवळी, गणेश परबत, विष्णू अनपट, सरपंच रणजितसिंह पाटील, भाऊसाहेब गवळी, मा.सरपंच प्रमोद भोसले,भाऊसाहेब रमाकांत केवठे, बाळासाहेब कदम, दत्ता कदम, भाऊ गवळी, धनंजय काटकर, नाना जाधव, अमित घोलप व गावातील अनेक तरुण वर्ग उपस्थित होता.