रत्नापिंप्रीत भुरट्या चोरांचा धुमाकूळ
वृत्तसेवा – श्री मयूर पाटील – रत्नापिंप्री ता. पारोळा( प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथील आज मध्ये रात्री भूरट्या चोरांनी धुमाकूळ घातला एकाच रात्रीच आठ घरांची कुलपे तोडून घरांमधील सामान अस्ताव्यस्त करीत किरकोळ चोरी केल्याची घटना समोर आली आहे याबाबत पारोळा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांनी घटनेची पाहणी केली असून यात ग्रामस्थांनी कुठलीही तक्रार नोंदणी नसल्याचे समजते गावातील दिवसा कुलूप लावलेल्या घरांची पाळत ठेवत या चोरांनी रात्री या घरांची कुलपे तोडून कपाटे फोडून किरकोळ सामानाची चोरी केली आहे फुटलेले घर मालक बाहेरगावी राहत असल्याचे समजते तर याबाबत पाळणापूरचा कुठलीही नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले ..