लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा.
लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “बालिका दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील सहशिक्षक श्री सचिन भुजबळ हे होते.
यावेळी अध्यक्ष श्री भुजबळ सर व प्राचार्य श्री भीमराव आवारे यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण केले होती.
अध्यक्षीय भाषणामध्ये श्री भुजबळ सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रिया विषयी असलेल्या कार्याचा आढावा घेतला.
विद्यार्थिनींच्या वतीने इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनी स्वरांजली देवकर, स्वेता निंबाळकर, भाग्यश्री जाधव, उत्कर्ष सलगर, संस्कृती फडतरे, शिवानी भाळे,माने, इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी जान्हवी पवार, इ. सातवी मधील विद्यार्थिनी सुफिया मुलानी , सानिका खाडे, धनश्री डोईफोडे, श्रेया डोंगरे, समृद्धी नरुटे यांनी मनोगत व्यक्त केली.
○कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती वर्षा जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थिनी समृद्धी गायकवाड व स्नेहल वाघमोडे यांनी केले. तर आभार साक्षी खाडे हीने मानले.