सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मालेवाडा येथे अभिवादन
रजत डेकाटे -प्रतिनिधी
मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा स्वाती सहारे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती सहारे तर
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच राखी इंगोले तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत मालेवाडा चे उपसरपंच फुलचंद मेश्राम यावेळी उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य मनोहर वानखेडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सहाय्यक शिक्षक सुरज येल्ले यांनी
सावित्रीबाई फुले यांनी कशाप्रकारे शिक्षण देण्याचे काम केले याबाबत विद्यार्थ्यांना महत्त्व समजावून सांगितले.
सावित्रीबाई फुले ह्या आणि ज्योतिराव फुले हे शाळा चालवत असताना त्यांच्यावर किती अन्याय झाला हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले
सहाय्यक शिक्षिका वर्षा कश्षप यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका शिला रोडे यांनी तर सूत्रसंचालन वर्षा चापले यांनी केले तर अजय झोडापे यांनी आभार मानले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमेश लोनगाडगे.ग्रामपंचायत सदस्य रेखा येसनसुरे, दुर्गा सहारे, स्मिता बावणे, ज्ञानवंती ढुमणे, शाळेतील शिक्षिका भुमेश्वरी खोंडे, अंगणवाडी सेविका रंजना गेडाम, आशा वर्कर सुनिता गजघाटे उपस्थित होत्या.