क्रांतिज्योती ज्ञानज्योती वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मदनवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती साजरी करण्यात आली.
(निलेश गायकवाड)
मदनवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पूजन केले तर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर तसेच ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक बंडगर ग्रामपंचायत सदस्य सतीश सकुंडे, शहाजी बंडगर, राजेंद्र देवकाते, सामाजिक कार्यकर्ते अरविंद देवकाते, दादा ढवळे व ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.