पंढरपूर तालुक्यातील होळे येथे संपादकाला घरकुल दलालाची शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी.
पिंपरी बुद्रुक:
दिनांक-01/01/2025
प्रतिनिधी:समाधान रजपूत.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामधील होळे येथे होणाऱ्या घरकुलाची चौकशी वंचित न्यूज चैनल चे संपादक सचिन बाबर यांनी केले असता तेथीलच प्रमोद बाबर यांनी त्यांना शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
घरकुलाची कामे कुठपर्यंत आलेली आहेत याची चौकशी संपादक सचिन बाबर यांनी केली असता त्यांना त्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये घोटाळा आढळून आला. त्यामुळे त्यांनी चौकशी केली तर प्रमोद बाबर यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे वंचित न्यूज चे संपादक सचिन बाबर यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. सत्य जगासमोर आणणाऱ्या पत्रकारांना किंवा संपादकांना जर असा समाजातील काही समाजकंटकांकडून त्रास होत असेल तर सर्व पत्रकार हा अशा लोकांचा निषेध करत आहेत. या व्यक्तीवर पोलीस स्टेशनमध्ये लवकरात लवकर कारवाई जर झाली नाही तर महाराष्ट्रातील सर्व पत्रकार हे आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार संघटनांनी दिलेली आहे.