करमाळा प्रतिनिधी :- देशभक्त स्व.नामदेवरावजी जगताप यांच्या जयंतीचे व जे.सी.आर.पी. हेल्थ कल्बच्या वर्धापन दिनानिमीत्त जे.सी.आर.पी. हेल्थ क्लब करमाळा यांनी गुरूवार दि. 09 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजता जीम इव्हेंट कॉम्पिटीशनचे आयोजन नामरत्न कॉम्प्लेक्स, मेन रोड येथे केलेले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते होणार आहे.
सदर स्पर्धा पुढीप्रमाणे वजनगटात पार पडणार असून 55 ते 65 किलो वजन गट, 65 ते 75 किलो वजन गट व 75 किलो वजन गटापासून खुला अशा पध्दतीने आयोजन केलेले आहे. तसेच प्रती वजन गटात प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना मेडल दिले जाणार आहे. तसेच सदर स्पर्धेकरिता पंच कमिटी म्हणून महेश निकत, ॲङ संग्राम माने, पृथ्वीराज सुर्यवंशी, समीर सय्यद, संकेत हांडे, उबेद शेख हे काम पाहणार आहेत.
तरी स्पर्धेच्या आयोजनासाठी पृथ्वीराज जगताप, विश्वराज जगताप, कमलेश रच्चा, प्रताप रोडे पाटील आदीजण अथक परिश्रम घेत आहेत.