प्रवाहा विरोधातील पत्रकारिता हीच खरी पत्रकारिता !
हल्ली शोध पत्रकारितालोप पावत चालली आहे. बातमीच्या मुळाशी जाऊन बातमी मागची बातमी ज्याला लिहिता येते तोच खरा पत्रकार असतो. प्रेस नोट वा पत्रकार परिषदेतील होस्टने दिलेली माहिती जशीच्या तशी फॉरवर्ड करणे हीच आज पत्रकारिता मानली जाते.याला आपण पोस्टमनगिरी म्हणू शकतो. बहुतांश पत्रकार या पोस्टमनगिरीला पत्रकारिता मानू लागले आहेत.
पुर्वी राजकिय नेते पत्रकार परिषद घ्क्यायचे धाडस क्वचितच करीत असत.कारण त्यावेळचे पत्रकार क्रॉस क्वश्चन ( प्रतिप्रश्नाचा ) भडिमार करून त्यांना भंडावून सोडत असत. आयोजक बोले व पत्रकार डोले अशी परिस्थिती नसे. आत्ता पत्रकाप परिषद संपताच सुग्रास ( बहुदा नॉनवेज ) भोजन व नंतर आयोजकांनी पत्रकाराच्या ठरवलेल्या ग्रेडनुसार भरलेली पाकिटं यावर ताव मारायचा असल्याने प्रतिप्रश्न विचारणे समयोचित मानले जात नाही. याला काही अपवाद असतीलही परंतू अतिदुर्मिळ !
प्रवाहाविरोधात जाऊन पत्रकारिता करायला जीगर लागते. कारण यात तुम्हाला शासकिय पुरस्कार;मानसन्मान; पत्रकार भूषण; आदर्श पत्रकार असले पुरस्कारांवर पाणी सोडावे लागते. पाकिट पासून वंचित रहावे लागते; अजातशत्रू म्हणून मिरवता येत नाही. एखाद्या राजकिय पक्षाचा प्रवक्ता म्हणून मिरवून गाडी/ ड्रायव्हर व मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका/प्लॅट मिळवता येत नाही.प्रवाहा विरोधात जाउन पत्रकारिता म्हणजे सत्ताची साथ देणे; डोळे बंद करून नव्हे तर डोळे सताड उघडे ठेउन पत्रकारिता करणे. त्यासाठी सत्ताधारी व राजकारण्यांचा विरोध पत्करावा लागतो; कधी कधी कधी तर प्राण घातक हल्ले; अब्रूनुकसानीची नोटीस यांना सामोरे जावे लागते. कि घेतले न व्रत आम्ही अंधतेने या सावरकरांच्या वृत्तीने पत्रकारिता करावी लागते.
माझ्या पत्रकारितेच्या जीवनात मी या सर्व प्रसंगांना सामोरा गेलो आहे.माझ्या विरोधात स्वपक्षियांनी तसेच गीता कॉलनीतील रहिवाश्यांनी काढलेले मुर्दाबादचे मोर्चे; जमिल खानच्या गुंडांनी केलेला प्राणघातक हल्ला; अबु नुकसानीच्या अनेक नोटीसी; माझ्या कार्यक्रमांवरील बहिष्कार; आंदोलनाच्या बातम्या दडपण्याच्या मोबदल्यात मिळणारा मोबदला घेणारे पत्रकार यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. पुरस्कार तर कोसो दूर पळतात. माझ्या ४५ वर्षांच्या पत्रकारितेत मला पत्रकारितेबाबत एकही पुरस्कार लाभला नाही; हाच माझा माझा मोठा सन्मान आहे कारण मी पत्रकारिता असो की साहित्य क्षेत्रात कधीही कंपुगिरी केली नाही.
प्रवाहा विरोधात जाऊन मी लिहिलेल्या अलिकडच्या दोन बातम्या : पहिली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर केल्या गेलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मी प्रवाहा विरोधात जाऊन लिहिलेली बातमी. या आरोपांचा धुरला हवेत विरला परंतू बदनामीचा कलंक मात्र लेंगरेकरांवर लागला तो कायमचा ! ज्यांनी एकतर्फी बातम्या दिल्या ते तोंडघशी पडले !
महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांचे कोणीच काही बिघडवू शकच नाही म्हणून भदाणेची तळी उचलून धरणारे पत्रकार हे भदाणेची डॉक्टरेट बोगस असल्याचे व बडतर्फी होताच कसे तोंडघशी पडले हे सर्वश्रूत आहे.त्यावेळी ही अनेक पत्रकारांनी भदाणेची वेठबिगारी पत्करण्यास पत्रकारितेचे लेबल लावले होते.
दुसरा प्रसंग कालचाच आहे. शैलेश पाटील यांच्यावर एका बिल्डर कम नेत्याने १ कोटीच्या खंडणीचा आरोप केला. यच्चयावत सर्व पत्रकारांनी कोणतीही शहनिशा न करता गेमनानी यांनी केलेल्या आरोप पत्रांची बातमी केली. पोलीसांनीही न भूतो न भविष्यती अशी तत्परता दाखवत गुन्हा दाखल केला. मी मात्र प्रवाहा विरोधात जाऊन बातमी केली. काही पत्रकार व गेमनानीही नाराज झाला असेल परंतू मी सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. स्वप्नील पाटील यांनी सनद प्रकरणी आपणच केलेली तक्रार मागे घेऊन एक कोटी वसूल केले व गप्प बसला हा ही आरोप होता. मी खोलात जाऊन चौकशी केली असता तक्रार मागे घेण्याचा अर्जच बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तसे पाटील यांचे affidavite ही मिळवले. परंतू मॅगी पत्रकार अशी तसदी घेत नाहीत. त्यामुळे संबंधितांची बदनामी करण्यात आपणही अप्रत्यक्ष सहभागी होतो; याचे भान पत्रकारांना राहत नाही.
म्हणून पत्रकारांनी बातमीच्या खोलात जाऊन बातमी देणे अपेक्षित असते.त्यासाठी प्रवाहा विरोधात जाऊन केली पाहिजे ! कोणाला तोषविण्यासाठी पत्रकारिता करू नये !!
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०