भिगवणकरांच्यात धमक नाही असं म्हणायचं का.?
थापाड्या नेत्यांपासून किती दिवस दिशाभूल करून घेणार..रेल्वे थांबा अजून देखील प्रलंबिल प्रश्न
(निलेश गायकवाड)
भिगवण रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाडीचा थांबा 20 वर्षांपासून होता. मात्र कोविड 19 कोरोना आल्यापासून भिगवण रेल्वे स्थानकावरील एक्स्प्रेस गाडीचा थांबा बंद करण्यात आला आहे.
कोरोनापूर्वी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एक्सप्रेस, विजापूर फास्ट पॅसेंजर, सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाड्या भिगवण रेल्वे स्थानकावर थांबत होत्या.मात्र सध्या ही गाडी भिगवण रेल्वे स्थानकावर थांबत नाही.
22731 हैदराबाद एक्सप्रेस भिगवण रेल्वे स्थानकासाठी अत्यंत महत्त्वाची होती, भिगवणच्या आजूबाजूच्या 10 गावातील लोक या ट्रेनने दररोज भिगवण ते पुणे अप डाऊन प्रवास करत होते, परंतु आता ही ट्रेन भिगवण येथे थांबत नाही, त्यामुळे येथील लोकांना त्रास सहन करावा लागतोय.
पूर्वी 100 हून अधिक लोक रोज अपडाऊन करायचे. आणि पासधारकही वाट पाहत आहेत पण आता ट्रेनचे थांबे बंद करण्यात आले आहेत. अपडाऊन करणारे देवाचे लोक पुण्यात स्थलांतरित झाले आहेत आणि तिथेच राहत आहेत.
भिगवणच्या जनतेला पुण्यात शासकीय काम असल्याने दररोज पुण्याला जावे लागते.पुण्यातील जिल्हा रुग्णालय ससून आहे.
भिगवण येथील नागरिकांना पुण्यातील शिवाजी नगर जिल्हा न्यायालयात जावे लागते.पूर्वी भिगवणचे लोक रेल्वे थांबली की पुण्यात नोकरीसाठी जात असत, पण आता ट्रेन थांबत नसल्याने लोक जात नाहीत.
काय म्हणायचं भिगवण करांनो आहे का नाय धमक तुमच्यात.. दळण वळण वाढावा यासाठी आपण आपल्या जमिनी जागा देतो सरकारला. 20 वर्षांपासून सुरु असलेल्या रेल्वे थांबा बंद झाल्यामुळे किती नुकसान गावाचं झालाय.. थापा मारणाऱ्या या नेत्यांना गावात येऊ नाही दिलं पाहिजे. तुमच्याकडून गावातील हा अति ज्वलंत प्रश्न वर्षानुवर्षे सुटत नसेल तर काय करायचे या गावाच्या पुढऱ्याचं तरी…… धमक असेल तर त्या नेत्याने हे प्रश्न मार्गी लावून गावातील खुटलेला विकास पुर्वरत आणावा अशी मागणी त्रस्त झालेला नागरिक करत आहे.