January 8, 2025 3:01 pm

खंडणीबाजी की बिल्डरचे दबाव तंत्र समाजसेवकांवर दडपशाहीचा प्रयत्न !

अपनी भाषा में पढ़े! Translate

खंडणीबाजी की बिल्डरचे दबाव तंत्र
समाजसेवकांवर दडपशाहीचा प्रयत्न !
काल हिल लाईन पोलीस ठाणे येथे स्वप्नील पाटील या सामाजिक कार्यकर्त्या विरोधात एक कोटी रूपयांची खंडाणी मागितल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत तक्रारदार जो भाजप चा पदाधिकारी व व्यवयायाने बिल्डर आहे त्याने सुमारे एक डझन दैनिकांत बातम्या पेरून वातावरण निर्मिती केलीच होती.
एक कोटीची खंडाणी मागण्या एवढा गेमनानीचा मोठा घोटाळा तरी काय आहे; खरंच खंडणी मागितली असल्यास जो कोणी खंडणीबाज वा ब्लॅकमेलर असेल त्यास पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकाद्वारे रंगेहात पकडून देऊन बेड्या घालून त्याची शहरभर पायी ढिंड काढली असती तर तक्रारदार व पोलीसांचीही कर्तव्यकठोरता जगाला पाहता आली असती व आमच्या सारख्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्याने त्यांची वाहवाही केली असती.
एक बिल्डर ज्याच्या टिडिआर घोटाळा व अन्य अनियमितते बाबत ज्या कार्यकर्त्याने मंत्रालयापासून पुणे येथील सहाय्यक संचालक कार्यालयात आंदोलने केली त्यावर उचित कारवाई करण्या आधीच सदर बिल्डरने आपल्या वरील कारवाईचा बडगा टाळण्यासाठी व तक्रारदारांवर दबाव आणण्यासाठी पोलीसांशी संगनमत करून हा गुन्हा दाखल केला असावा; असे प्रथमदर्शनी तरी वाटते.
उल्हासनगर मध्ये खंडणीबाजांचा सुळसुळाट आहे हे मान्य करावेच लागेल; यात तथाकथित पत्रकार सामाजिक व राजकिय कार्यकर्ते तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते यांचा समावेश असतो. तक्रार करायची व समोरच्याला कारवाईची भीती दाखवून तोडबाजी करून तडजोड करायची प्रसंगी आपणच केलेला अर्ज मागे घ्यायचा किंवा तक्रारीबाबत मौन बाळगायचे; अशी मोडसऑपरेंडी असते. काही झोलाछाप पत्रकार व आरटीआय कार्यर्त्यांचा हा धंदाच झाला आहे.
दुसरीकडे बेकायदेशीर धंदेबाज उदाहरणार्थ : डान्सबार; लॉजचालक; हातभट्टीवाले; जुगाराचे अड्डे; क्लब चालक; बिल्डर हे यांचे लक्ष्य असतात. आपले गोरखधंदे लपवण्यासाठी वरील दोन नंबरवालेच या खंडणीबाज भस्मासूरांना पोसत असतात. अगदी डोईजड झालेच तर पोलीसांशी संगनमत करून वरील प्रमाणे खोट्या गुन्ह्यात अडकवून पायबंद घालण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केला जातो. उल्हासनगर मध्ये अगदी रास्ट्रपतींच्या नावानेही समन्स काढण्यात आले होते.अनेकांवर बलात्कार विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. नंतर त्याचे काय होते ते परमेश्वरच जाणो !
या पार्श्वभूमीवर राजा गेमनानी यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीचे एफ आय आर मध्ये रूपांतर करण्याआधी कथित पाच लाख रूपये ज्या व्यक्तिने सुरक्षा रक्षका समक्ष स्विकारले त्याचा शोध घेऊन शहनिशा केला पाहिजे होता. एक कोटी वरून पंचवीस लाखावर तडजोड केली मग उर्वरित वीस लाख घेताना रंगेहात का पकडून दिले नाही. पाच लाख तरी का दिले ? त्याचे स्रोत काय ते कुठून आणले ? याची शहनीशा न करता राजा बोले व पोलीस डोले ! अशी फिर्याद नोंदवली. त्यामुळेच या प्रकरणी तक्रारदार व पोलीसांभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. जे पत्रकार पाकिट घेऊन अश्या निराधार बातम्या देत आहेत; त्यांनी उद्या आपलाही “गेम” होऊ शकतो ! याते भान ठेवावे !
स्वप्नील पाटील हा दोषी आढळल्यास नक्कीच त्याच्यावर कारवाई करा परंतू एक गुन्हेगार स्वतःला वाचवण्यासाठी एका आंदोलकाचे आंदोलन दडपण्यासाठी आपल्या पक्षाच्या बळावर पोलीसांना हाताशी धरून दहशत निर्माण करीत असेल तर ही प्रवृत्ती ठेचून काढायला हवी !

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!