January 9, 2025 11:04 am

दानशूर प्रताप शेठजी व पूज्य साने गुरुजी यांना अभिवादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

दानशूर प्रताप शेठजी व पूज्य साने गुरुजी यांना अभिवाद

 

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि दानशूर,श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभा पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी ११:३० वाजता संपन्न झाले.

प्रारंभी श्रीमंत स्व.प्रताप शेठजी व स्व.भगिरथीदेवी अग्रवाल यांच्या पुतळ्यांना व पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेस खानदेश मंडळ पदाधिका-यांनी माल्यार्पण केले.

या प्रसंगी राज्यशास्त्र विषयाचे माजी विभागप्रमुख

डॉ.एल.एल.मोमया यांनी श्रीमंत प्रताप शेटजी यांचे कार्यकर्तृत्व या विषयावर व्याख्यान दिले.ते म्हणाले की, श्रीमंत प्रताप शेटजी यांनी अमळनेर सारख्या ग्रामीण भागात शिक्षण, वैद्यकीय, आध्यात्म, उद्योग आदि क्षेत्रात मौलिक कामगिरी केली असून अनेकांना रोजगार मिळवून दिला. शिक्षणाची सोय केली. अशा अपूर्व कार्यामुळे प्रताप शेटजी हे जनमानसाच्या मनात घर करून बसले.”

पूज्य साने गुरुजी यांचा जीवन परिचय या विषयावर सामाजिक कार्यकर्ते तथा साने गुरुजी यांच्या साहित्याचे अभ्यासक गोपाळ नेवे यांनी साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले. साने गुरुजींच्या अनेक आठवणी त्यांनी याप्रसंगी सांगितल्या. सानेगुरुजी यांचे लेखन कार्य आणि त्यांचे विविध क्षेत्रातील मौलिक कार्य यावेळी त्यांनी ओघवत्या शैलीत मांडले. सदर अभिवादन सभा प्रसंगी प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.

प्रस्तुत अभिवादन सभेचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.धनंजय चौधरी यांनी केले तर

सूत्रसंचालन व आभाराची जवाबदारी डॉ.रमेश माने यांनी पार पाडली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!