फार्मसी कॉलेज येथे एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन संपन्न
अमळनेर: विक्की जाधव.
स्व. पी.सी.बी. कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रो. र. का. केले कॉलेज ऑफ बी.फार्मसी व क्लिनॉमिक क्लिनिकल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मसी व MSc च्या विद्यार्थ्यांसाठी “Career Opportunities in Clinical Research and Pharmacovigilance” या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत डाॅ. राहुल सोमानी, हेड ग्लोबल फार्माकोव्हिजीलन्स, अल्केम लॅबोरेटरीज, मुंबई यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा लाभ बी.फार्मसी, डी.फार्मसी आणि MSc अशा विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी घेतला, तसेच फार्मसी विद्यालयातील व प्रताप महाविद्यालयातील 30 प्राध्यापकांनीही उपस्थिती दर्शवली.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डाॅ. जोशी, प्रा. डाॅ. सौ. सुर्यवंशी, प्रा. रविंद्र माळी, प्रा. अनिल बोरसे, प्रा. देवेश भावसार, श्री. गौरव चौधरी, आणि श्री. केतन चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
भविष्यातही अशासमान कार्यशाळांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या हितासाठी केले जाईल, अशी अपेक्षा खा.शि. मंडळाचे संचालक व फार्मसी विभागाचे चेअरमन. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य आणि फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डाॅ. रविंद्र स. सोनवणे यांनी व्यक्त केली.
सदर कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी क्लिनिकल रिसर्च आणि फार्माकोव्हिजीलन्स क्षेत्रात करिअरच्या संधींबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देणारी ठरली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक दिशा मिळाल्या.