रुग्णांना शिवीगाळ करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर: तालुक्यातील मांडळ येथील रुग्णांना शिवीगाळ करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मांडळ येथे ज्ञानेश्वर शालीक पारधी यांची पत्नी हिराबाई सहा महिन्यांची गर्भवती असून, दोन-तीन दिवसांपूर्वी तिला प्रसूतीपूर्व कळा सुरू झाल्या. घरात कोणतीही व्यक्ती नसल्याने तिला दुखांच्या कळा सहन करतांना विव्हळत आले. गावातील आशा स्वयंसेविकांनी तिची परिस्थिती पाहून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टरांना बोलवायला गेले, परंतु डॉक्टरांनी महिलेच्या घरी येण्यास नकार दिला.
आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध असलेल्या १०२ रुग्णवाहिकेची अनुपलब्धता असल्याने महिलेच्या पतीने तिला खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला धुळ्यात हलवण्यात आले. दुसऱ्या दिवशी,सदर महिलां प्रसूत झाल्यानंतर तिचे बाळ मेले. या प्रकरणाबाबत महिलेचे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्रात जाब विचारायला गेले असता, तेथील महिला डॉक्टर प्रतीक्षा पाटीलने त्यांना घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. असा आरोप त्यांच्यावर केला जातं आहे. यावर ज्ञानेश्वर पारधी, संदीप शिरसाठ, शांताराम कोळी, शंकर धनराज, कैलास पारधी, सोमनाथ कोळी, अक्षय कोळी,प्रवीण रोडे, भावेश रोडे, ज्ञानेश्वर कोळी, दीपक कोळी, अशोक बडगुजर, नरेंद्र परदेशी यांच्यासह मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. प्रतीक्षा पाटील व डॉ. साक्षी बोरसे यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारींना निवेदनाद्वारे दिली आहे.
या घटनेने आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचार्यांच्या वागत असलेल्या परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. रुग्णांची काळजी घेणे व त्यांना आवश्यक त्यां योग्य सेवा पुरविणे अपेक्षित आहे.