January 31, 2025 10:31 am

लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार स्वमर्जीचा – ऍड ललिता पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार स्वमर्जीचा – ऍड ललिता पाटील

 

अमळनेर : विक्की जाधव.

स्वाधार संघाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील यांनी स्पष्ट केले की, महिलांना वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार असून त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढले जाऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी सिव्हिलच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले की, जो राहील त्याचे घर असले पाहिजे आणि जो कसेल त्याची जमीन. त्यामुळे, कोणतीही व्यक्ती त्यांना त्यांच्या घरातून काढू शकत नाही.

ऍड ललिता पाटील यांनी पुढे सांगितले की, जर कोणी बळजबरीने वेश्या व्यवसाय चालवत असेल तर संघर्ष करण्यासाठी स्वाधार संघ आणि. मी स्वतः पुढे येईल. “ह्या महिलांना देखील स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे,” असे त्यांनी विशेषतः नमूद केले. त्यांनी यावर जोर दिला की, समाजात लैंगिक कामगार महिलांच्या मुळेच आमच्या सारख्या इतर महिलांची सुरक्षितता आहे. असेही तें म्हटले.

न्यायालयाने या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत, पण कॅमेरे अद्याप बंद आहेत आणि ते लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाच्या नुकत्याच झालेल्या निर्णयाच्या आधारावर, काही लोक लैंगिक कामगार महिलांना धमकावत आहेत, त्यांची मालमत्ता जप्त होईल असे सांगत त्यांच्यात दहशत निर्माण करत आहेत.

यावेळी ऍड सलीम खान यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत सांगितले की, महिलेला तिच्या स्वमर्जीने लैंगिक व्यवसाय करण्याचा हक्क आहे. न्यायालयाने याबाबत पुनर्वसनाचे निर्देश दिले आहेत; परंतु यावर गंभीरता कमी असल्यामुळे महिलांचे पुनर्वसन होत नाही. कार्यक्रमाचे प्रस्तविक आधार संस्थेचे प्रतिनीधी भारती पाटील यांनी केले. या महिलांनी आपली उपजीविका कशी करायची हा एक मोठा प्रश्न आहे.”

एका लैंगिक व्यवसायिक महिलेने यावेळी सांगितले की, “आमच्याकडे १८ वर्षाखालील मुलींबाबत काही शंका असल्यास केव्हाही छापा टाका. आम्ही हीं स्वतःच्या परिवारासह राहतो. सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि दोषी आढळल्यास कारवाई करा, परंतु हेतुपुरस्कर त्रास देऊ नका.”

या पत्रकार परिषदेत, व्यवसायिक महिलांचे हक्क, सुरक्षाबाबतची चिंता आणि समाजाने त्यांच्याबाबत घेतलेल्या दृष्टीकोनावर मोलाची चर्चा करण्यात आली. या विषयावर यथायोग्य व परिवर्तनकारी निर्णय घेतले जातील, अशी आशा व्यक्त केली गेली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!